सैफ अली खानने ऑटो रिक्षाचालकाला बक्षिस म्हणून दिले 'एवढे' पैसे
ऑटो रिक्षाचालक भजन सिंग राणांची प्रतिक्रिया
23-Jan-2025
Total Views | 560
मुंबई : मुंबईमधील बॉलिवूड अभिनेता आणि नवाब सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) घरात एका बांगलादेशी युवकाने घुसखोरी करत हल्ला केला. ही घटना १६ जानेवारी २०२४ रोजी घडली होती. या हल्ल्यामध्ये सैफ अली खानवर चाकूने वार करण्यात आले होते. यामध्ये सैफला मणक्यामध्ये मोठ्या प्रमाणात जखम झाली होती. त्याच्यावर लीलावती रुग्णालयामध्ये काही तासांची शस्त्रक्रिया झाली होती. दरम्यान सैफ अली खानला रुग्णालयामध्ये जाण्यास वाहन उपलब्ध नव्हते. त्यावेळी त्याचा मुलगा इब्राहिमने त्याला एका ऑटोरिक्षाद्वारे लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र आता ऑटो रिक्षाचालकाला सैफ अली खान भेटला होता. तसेच त्याला मोठी रक्कमही देण्यात आली होती.
सैफ अली खानच्या भेटीनंतर ऑटो रिक्षाचालक भजन सिंह राणा याने अभिनेत्याला भेटल्याबद्दल त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाकडून मिळालेल्या कौतुकाबद्दल सांगितले. राणाला बक्षिसासाठी अनेक संपर्क केले गेले होते. मात्र राणाने कोणत्याही एक रोख बक्षिसाची आवश्यकता नसल्याचे सांगितले.
सैफ अली खानला सोमवारी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, त्यानंतर तो घरी परतला. त्याआधी राणाने सैफ आणि त्याच्या कुटुंबीयांची रुग्णालयामध्ये भेट घेतली. त्याचपार्श्वभूमीवर एका प्रसारमाध्यमाने भजनसिंग राणा यांची प्रतिक्रिया घेतली, ते म्हणाले की, ऑटो चालकाला विचारण्यात आले होते की, सैफने त्याला एखादी नवीन ऑटो रिक्षा भेट दिली तर तो घेईल का? राणाने उत्तर दिले की, मागितले नाही पण त्यांची इच्छा असेल तर ते मी स्वीकारेन. मी असे कधीच म्हणणार नाही की, मी जे केले आहे त्यामुळे मला काधी काही मिळावे. मला काही मिळवण्यासाठी मी कधीच काही केले नाही. पुरस्कार मिळवण्यासाठी असा दावा मी कधीच केला नसून मी हे लोभेमुळे करत नाही, असे रिक्षाचालक म्हणाला.
एका प्रतिष्ठीत प्रसारमाध्यमाला राणा म्हणाले की, सैफ अली खानला वेळेवर केलेल्या मदतीचे आभार मानले. त्यांनी आर्थिक मदतही केली आहे. तरीही नेमकी रक्कम किती दिली यावर राणाने थेट उत्तर दिले नाही. राणा म्हणाला की, लोकांनाच सांगू द्या की सैफ अली खानने त्याला ५० हजार किंवा १ लाख रुपये दिले असावेत. मात्र मला ती रक्कम उघड करता आली नाही. या प्रकरणाची माहिती कोणालाही सांगू नये, असे सांगितले आहे. मी सैफ अली खानचे वचन पाळेन, असे राणा म्हणाला होता.