एकत्रित सभा घेत फूस लावत पुजारी म्हणवून घेणाऱ्या युवकाने हिंदूंचे केले धर्मांतरण

    08-Sep-2024
Total Views | 42
 
Conversion
 
लखनऊ : संजीव कुमार नावाच्या व्यक्तीला पुजारी म्हणत हिंदू संघटनांनी त्यांच्यावर हिंदूंचे धर्मांतरण 
(Conversion) करण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे. धर्मांतरणासाठी संजीव कॅलेशिया सभेच्या बहाण्याने लोकांना एकत्रित करायचा. यावेळी मात्र हिंदू संघटनांनी एकत्र पोहोचून गोंधळ घालायला सुरूवात केली. यावेळी पोलिसांनी आरोपी संजीवला ताब्यात घेऊन याप्रकरणाची चौकशी सुरू केली. ही घटना ७ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशातील सीतापूर येथे घ़डली आहे.
 
हे प्रकरण सीतापूर जिल्ह्यातील सदरपूर पोलीस ठाणे हद्दीतील असून शनिवारी राष़्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हा उपाध्यक्षांनी याप्रकरणात लक्ष घालून पोलिसात तक्रार केली. यावेळी राहुलने तक्रारीत सांगितले की, देवरिया गावात संजीव कुमार नावाच्या एक धर्मांतरित ख्रिश्चन असणाऱ्या व्यक्तीने सभा घेत हिंदूंचे ख्रिश्चन धर्मांतरण केल्याचा आरोप आहे.
 
यावेळी संजीवने स्वत:चे ख्रिश्चन धर्मात धर्मांतरण केले होते. त्याने हिंदूंनाही ख्रिश्चन धर्मात धर्मांतरण करण्यास सांगितले. यावरून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी देवरिया गावात जाऊन संबंधित घडलेल्य़ा प्रकरणाविषयीची माहिती जाणून घेतली.
 
पुढे राहुल यांनी तक्रारीत सांगितले की, घडलेली माहिती योग्य असून संजीव गावातील हिंदूंना धर्मांतरण करण्यास सांगत असल्य़ाचे आढळून आले आहे. तो एका घरात सभा घेऊन लोकांना फूस लावत असल्याचा आरोप संजीव करण्यात आला. यावेळी सुरू असलेल्या सभेवेळी राहुल आणि त्य़ाच्या साथीदारांनी गोंधळ घातला असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी संजीवला ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांनी याप्रकरणाचा पुढील तपास सुरू ठेवला आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121