‘आयसी ८१४’ प्रकरणी नेटफ्लिक्सची माघार, दहशतवाद्यांची खरी नावे दाखवणार

    03-Sep-2024
Total Views | 100

ic814
 
 
नवी दिल्ली, दि. ३ : विशेष प्रतिनिधी : ‘IC814 – द कंदहार हायजॅक’ वेबसीरिजप्रकरणी नेटफ्लिक्सने आपली चूक मान्य करून माघार घेतली आहे. वेबसीरीजच्या प्रारंभीच दहशतवाद्यांची खरी नावे दाखविण्याचा निर्णय नेटफ्लिक्सने घेतला आहे.
 
‘आयसी ८१४ – द कंदहार हायजॅक’ या वेबसीरीजीमध्ये मुस्लिम दहशतवाद्यांना हिंदू नावे देण्याचा अतिशय गंभीर प्रकार घडला होता. देशभरातून त्याविषयी संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने नेटफ्लिक्स इंडियाच्या आशयनिर्मिती प्रमुख मोनिका शेरगिल यांना मंगळवारी पाचारण केले होते. माहिती व प्रसारण मंत्रालयातील सचिव संजय जाजू यांची त्यांनी भेट घेतली. यावेळी जाजू यांनी वेबसीरीजविरोधात देशात असलेल्या रोषाची जाणीव शेरगिल यांना करून दिली. अशाप्रकारच्या राष्ट्रीयदृष्ट्या संवेदनशील विषयांचे चित्र करताना भान ठेवावे, असेही शेरगिल यांना सुनावण्यात आले आहे.
 
बैठकीनंतर नेटफ्लिक्सने माघार घेऊन आपली चूक मान्य केली. शेरगिल त्याविषयी म्हणाल्या, “इंडियन एअरलाइन्स फ्लाइट ८१४ च्या १९९९ सालच्या अपहरणाबद्दल अपरिचित असलेल्या दर्शकांसाठी, अपहरणकर्त्यांची खरी आणि कोड नावे समाविष्ट करण्यासाठी सुरुवातीचे अस्वीकरण अद्यतनित केले गेले आहे”, असे शेरगिल यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता सनी अहमद काझी, शाकीर, मिस्त्री जहूर इब्राहिम, शाहिद अख्तर सय्यद, इब्राहिम अथर या पाकिस्तानी मुस्लिम दहशतवाद्यांची नावे वेबसिरिजमध्ये दिसणार आहेत.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
मुंब्रा रेल्वे दुर्घटनेबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचे रेल्वे विभागाला खडेबोल! विचारले... या घटनेची जबाबदारी कुणाची?

मुंब्रा रेल्वे दुर्घटनेबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचे रेल्वे विभागाला खडेबोल! विचारले... या घटनेची जबाबदारी कुणाची?

मुंब्रा लोकल स्थानकाजवळ ९ जून रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास दुर्घटना घडली होती. दोन लोकल गाड्या एकमेकांजवळून जाताना लोकलच्या दारात लटकलेल्या प्रवाश्यांच्या बॅगा घासल्यामुळे ६ प्रवाशांचा रेल्वे रुळावर पडून मृत्यू झाला होता. या घटनेवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरूवार दि. १९ जून रोजी प्रवाशांच्या मृत्यूंबाबत एका जनहित याचिकेवर सुनावणी करत असताना चिंता व्यक्त केली आणि मध्य रेल्वेने मुंबई लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित बंद दरवाजे बसवण्याचा विचार करावा, असा सल्ला दिला...

क्रेडाई एमसीएचआय युथतर्फे नवी मुंबईसाठी पुनर्विकास प्रदर्शनाचे आयोजन

क्रेडाई एमसीएचआय युथतर्फे नवी मुंबईसाठी पुनर्विकास प्रदर्शनाचे आयोजन

नवी मुंबई आणि रायगड भागातील गृहनिर्माण क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या पहिल्याच उपक्रमात चाळीस वर्षांखालील तरुण रिअल इस्टेट डेव्हलपर्सची संघटना, क्रेडाई एमसीएचआय युथतर्फे सिडको Exhibition सेंटर रविवार, २९ जून २०२५ रोजी सकाळी 10:00 ते संध्याकाळी 8:00 वाजेपर्यंत मेगा पुनर्विकास प्रदर्शन योजले आहे. आज नवी मुंबईतील हॉटेल ताज विवांता येथे रिअल इस्टेट उद्योगातील वरिष्ठ नेते, क्रेडाई एमसीएचआय युथचे पदाधिकारी आणि माध्यमांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121