"अखिलेश यादवमध्ये औरंगजेबाचा आत्मा शिरला", योगी आदित्यनाथ कडाडले

    19-Sep-2024
Total Views | 32

Yogi Adityanath
 
अयोध्या : योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, अखिलेश यादव हे गुंडांसमोर नाक रगडतात. ज्याप्रमाणे कुत्र्याचे शेपूट सरळ करता येत नाही, त्याचप्रमाणे समाजवादी पक्षाशी निगडित असलेले कधीही सुधारणार नाहीत. त्यांच्यात औरंगजेबाचा आत्मा शिरला आहे. त्यांना हिंदूंविरोधी वागण्यास प्रोत्सहान देत असल्याची टीका त्यांनी केली आहे. त्यांनी १९ सप्टेंबर रोजी अयोध्येत विकासकामांचे उद्घाटन करतेवेळी उपस्थितांना संबोधित केले आहे.
 
अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ यांना गुंडा, माफिया असे म्हणाले होते. आता .योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश यादवची तुलना ही औरंजेबाशी केली आहे. नुकत्याच अयोध्येत विकासकामांसाठी योगी आदित्यनाथ गेले होते. त्यावेळी त्यांनी विकासकामांची पाहणी केली होती. यावेळी ते उपस्थितांना संबोधित करत असताना त्यांनी वक्तव्य केले आहे.
 
 
 
गुंड आणि योगी आदित्यनाथ यांच्यात काही फरक नसल्य़ाचा अखिलेश यांच्या विधानास योगी आदित्यनाथ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, जो व्यक्ती गुंडांसमोर नाक रगडतो. जो दंगलखोरांसमोर गुडघे टेकतात, जे भारताच्या संथ परंपरेला गुंड म्हणतात. हीच त्यांची म्यूल्ये आहेत. त्यांच्यात औरंगजेबाचा आत्मा शिरला आहे. त्यांनी हिंदूंविरोधी काम करण्यास प्रोत्सहान दिले असे दिसत असल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.
 
एवढेच नाहीतर त्यांनी उत्तर प्रदेशातील बलात्कारप्रकरणी भाष्य केले आहे. योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पार्टीतील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा मोईद खान यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, समाजवादी पक्षाचा खरा चेहरा हा मोईद खान आहे. कारण मोईद खानने जे भदरसात केले तेच आता समाजवादी पक्षाचे नेते नवाब सिंह यादव यांनी कनौज येथे केले आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121