अंधेरीत लोखंडवालामध्ये दोन बंगल्यांना भीषण आग

    19-Sep-2024
Total Views | 17
Lokhandwala Fire news

मुंबई : अंधेरी लोखंडवाला परिसरातील सेकंड क्रॅास लेनमध्ये दोन बंगल्यांना भीषण आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या भीषण आगीत दोन्ही बंगले जळून खाक झाले आहेत. दोन बंगल्यांच्या तळमजल्यापासून आणि पहिल्या मजल्यापर्यंत ही आग पसरलेली होती. दरम्यान अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. दोन तासानंतर अग्निशमन दलाला या आगीवर नियंत्रण मिळवता आले.
मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील बंगला क्रमांक ११ मध्ये ही आग लागली. त्यानंतर ही आग पसरत गेल्याचं सांगण्यात आले. या बंगल्यात कुणीही राहत नसल्याने जीवितहानीचा धोका टळल्याची प्राथमिक माहिती आहे. यावेळी घटनास्थळी अग्निशमन दलासोबतच रुग्णवाहिका, अदानी इलेक्ट्रिक, महापालिकेचे अधिकारी पोहचले होते. मात्र आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.
अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121