मोठी बातमी! अवैध मशीद जमीनदोस्त होणार, मंडी महापालिकेचा कट्टरपंथींना दणका
13-Sep-2024
Total Views |
शिमला : हिमाचल प्रदेशातील मंडी येथील असलेली अवैध मशीद (illegal mosque) पाडण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून हिंदूंनी निदर्शने दर्शवली होती. मात्र आता अवैध असलेली ही मशीद तोडण्याचे आदेश मंडीचे महाआयुक्त एसएस राणा यांच्या न्यायालयाने १३ सप्टेंबर रोजी आदेश दिला. मशीदीचे बेकायदेशीर काम येत्या ३० दिवसांत हटवावे असे आदेश न्यायालयाने दिले होते. जेल रोड येथील परिसरात कोणतीही परवानगी न घेता मशीद बांधण्यात आली होती. यामुळे आता न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे.
यावेळी मंडी येथील असलेल्या संबंधित मशीदीवर दोन मजल्याचे अवैध बांधकाम केले होते. यावेळी पीडब्ल्यूची देखील कोणतीच परवानगी घेतली नव्हती. यावेळी मशीदीच्या असलेल्या चार भिंतींचे बांधकामही योग्यरित्या बांधल्या नसल्याचे सांगितले गेले. यामुळे या मशीदीच्या बांधकामावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले.
याप्रकरणात अनेक लोकं रस्त्यावर उतरून निदर्शने दाखवू लागली होती. यावेळी निदर्शने करणाऱ्यावर पाण्याने फवारणी करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी कलम १६३ लागू केला होता. दरम्यान आता याप्रकरणात मंडी येथील काही कट्टरपंथींनी अवैध मशीद तोडण्यास सुरूवात झाली आहे.
मशीदीचे शौचालय आणि चार भींती तोडण्याचे काम केले होते. यावेळी मशीदीच्या समीतीने सांगितले की, त्यांनी पीडबल्यूच्या जागेत भिंत घातली होती. त्यामुळे पीडब्लूडीने हे पाऊल उचलले आहे. यावेळी घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा उपस्थित आहे. त्यावेळी पोलिसांनी तणावाची परिस्थिती हताळण्याचा प्रयत्न केला आहे.