तुम्ही पवारांचे दलाल! इतरांबद्दल काय चर्चा करता? संजय शिरसाटांचा राऊतांना सवाल

    11-Sep-2024
Total Views | 202
 
Raut & Shirsat
 
मुंबई : तुम्ही शरद पवारांचे दलाल आहात. इतरांबद्दल काय चर्चा करता? असा सवाल शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी संजय राऊतांना केला आहे. महायूतीच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊतांनी टीका केली होती. यावर आता शिरसाटांनी त्यांना प्रत्युत्तर दिले.
 
महायूतीत अजित पवार हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत, असं वक्तव्य राऊतांनी केलं होतं. यावर संजय शिरसाट म्हणाले की, "अजितदादा मुख्यमंत्री होणार की, नाहीत हे आमचं आम्ही पाहू. पण उद्धव ठाकरेंबद्दल तुमचं मत काय आहे? ज्यांनी शिवसेनाप्रमुखांचे विचार सोडले, त्यांना मुख्यमंत्रीपद देणार आहात का? यावर राऊतांनी भाष्य करावं. दिल्लीच्या आणि शरद पवारांच्या घराच्या वाऱ्या करून थकले पण दुर्दैवाने तुमचं नाव कुणीही घेत नाहीत. त्यामुळे आमची चिंता करू नका. शरद पवारांचे तुम्ही दलाल आहात. इतरांबद्दल काय चर्चा करता? शेवटी आता मी उबाठाला संपवलं आहे, हे तुम्हाला सिद्ध करायचं असल्यामुळे तुम्ही असे बेताल वक्तव्ये करत आहात," असा घणाघात त्यांनी केला.
 
हे वाचलंत का? -  म्हाडा लोकशाही दिन! सर्वसामान्यांना मिळतोय तक्रार निवारणाचं हक्काचं व्यासपीठ
 
अजित पवारांनी एकनाथ शिंदेंपेक्षा मोठी गद्दारी केली आहे, असेही संजय राऊत म्हणाले होते. यावर शिरसाट म्हणाले की, "अजित पवारांनी काय केलं आणि काय नाही, याकडे संजय राऊतांसारख्या बिनडोक माणसाने लक्ष देण्याची गरज नाही. तुम्ही काय केलं, तुम्ही कुणाचे दासी बनून बसलेत, याकडे लक्ष द्या. आज तुम्ही कुणाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत, तुमचं अस्तित्व कसं शून्य झालं याकडे लक्ष द्या. त्यामुळे तुमची अवस्था आता घर का ना घाट का अशी झाली आहे. संजय राऊतांच्या बडबडीला महाविकास आघाडीमध्येसुद्धा कुणी महत्व देत नाहीत," अशी टीकाही त्यांनी केली.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
बेकायदेशीर बाईक टॅक्सीवर कडक कारवाई अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर वायुवेग पथकाची कारवाई

बेकायदेशीर बाईक टॅक्सीवर कडक कारवाई अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर वायुवेग पथकाची कारवाई

मुंबई महानगरात काही प्रवासी अवैध मार्गाने बाईक टॅक्सीच्या माध्यमातून प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले. काही दिवसांपूर्वी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतःच स्टिंग ऑपरेशन करत हा प्रकार उघडकीस आणला. तसेच, याबाबत परिवहन विभागाकडे अनेक तक्रारी देखील प्राप्त झाल्या. त्या अनुषंगाने विभागाकडून तातडीने तपास सुरू करण्यात आला. यामध्ये काही अप्रमाणित ॲप्स व बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालकांकडून शासनाच्या कोणत्याही परवानगीशिवाय प्रवासी वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. अशा अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121