ठाणे महापालिकेसाठी नविन मुख्यालय - प्रशासनाच्या हालचालींना वेग

रेमंडच्या सुविधा भूखंडावर होणार ३२ मजली ठामपा मुख्यालय

    06-Aug-2024
Total Views | 40

Thane palika
 
ठाणे : ठाणे महापालिकेचे मुख्यालय सध्या पाचपाखाडी भागात आहे.परंतु तेथील जागा कमी पडत असल्याने नवीन मुख्यालय उभारण्यात येणार आहे. राज्य शासनाने कॅडबरी जंक्शन रेमंड येथील ४ एकरच्या सुविधा भुखंडावर ३२ मजली नवे महापालिका भवन उभारण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. ठाणे महापालिकेने यासंदर्भात निविदा प्रसिद्ध केली असून तब्बल ५७२ कोटींचा खर्च अपेक्षित धरला आहे. तर, शासनाकडून २५० कोटींना मंजुरी मिळाली आहे.
 
ठाणे शहराची लोकसंख्या २० लाखाच्या पार पोहचली असुन नगरसेवकांची संख्याही १३१ झाली आहे. तरीही ठाणे महापालिकेचा कारभार ३९ वर्ष जुन्या इमारतीतुन सुरू आहे. ठामपा मुख्यालयाची इमारत जीर्ण बनली असुन कामाचा व कागदपत्रांचा व्याप वाढल्याने नस्ती ठेवण्यासही जागा अपुरी पडत आहे.तेव्हा, दुरवस्था बनलेल्या ठामपा मुख्यालयाचा मेकओव्हर करण्याची अथवा ठाणे शहरातील एखाद्या भूखंडावर नविन मुख्यालय उभारण्याची मागणी होत होती. याबाबतचे वृत्त सर्वप्रथम दै. मुंबई तरुण भारत ने प्रकाशित केले होते.
 
ठाणे महापालिका क्षेत्रातील रेमंड उद्योग समुहाच्या ४ एकराच्या सुविधा भुखंडावर टीडीआरच्या मोबदल्यात महापालिकेची सुसज्ज बहुउद्देशीय इमारत पार्किगच्या सुविधेसह उभारण्यात येणार आहे.नव्या ३२ मजली भव्य इमारतीमध्ये प्रशासकीय विभागासह पार्किंगची व्यवस्था, उद्यान, महापूरूषांचा इतिहास दर्शवणारे भव्य दालन उपलब्ध असणार आहे. प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी ५७२ कोटींचे नियोजन करण्यात आल्याची माहिती ठामपा अधिकाऱ्यांनी दिली.
 
ठाणे महापालिकेचे निर्मिती १९८२ साली झाली असली तरी महापालिकेचे मुख्यालय असलेली पाचपाखाडी येथील इमारत १ आक्टोंबर १९८५ साली उभारण्यात आली.तळघर अधिक चार मजली असलेली ही इमारत जीर्ण बनली असल्याने नविन मुख्यालय उभारण्याची आवश्यक्ता होती. ठाणे महापालिकेत एकुण ४० च्या आसपास विभाग असुन तळघरात स्थावर मालमत्ता, औषध भांडार, जकात, भांडारगृह,आयटी विभाग, संगणक कक्ष,विद्युत विभाग आणि भंगार कक्ष आहे.
 
शासनाच्या नविन आकृतीबंधानुसार महापालिकेत कर्मचारी - अधिकारी वाढले त्याचबरोबर फायली,नस्ती वाढल्या. पण जागाच अपुरी असल्याने हे सर्व बाड ठेवण्यास तसेच कर्मचारी- अधिकाऱ्याना बसण्यास जागा तुटपुंजी आहे. तरीही, गेल्या तीन वर्षात इमारतीच्या पुर्ननिर्माणाचा तसेच नविन जागेत स्थलांतराचा प्रश्न अद्यापपर्यत प्रलंबितच राहिला होता. मध्यंतरी तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी, बाळकुम साकेत रस्त्यानजीक अद्ययावत ग्लोबल इम्पॅक्ट हब महापालिकेचा विचार करून उभारले होते.मात्र, कोविड काळात तेथे ग्लोबल हॉस्पिटल निर्माण केल्याने हा प्रस्ताव प्रलंबित होता.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांविरोधात हक्कभंग - विधानसभा अध्यक्षांकडून प्रस्ताव विशेषाधिकार समितीकडे सुपूर्द

आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांविरोधात हक्कभंग - विधानसभा अध्यक्षांकडून प्रस्ताव विशेषाधिकार समितीकडे सुपूर्द

विधानभवनात गुरुवारी झालेल्या हाणामारीच्या गंभीर घटनेनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कठोर निर्णय घेतला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याबरोबर विधान भवन परिसरात आलेले नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्यासमवेत आलेल्या सर्जेराव टकले यांची चौकशी करून, त्यांच्यावर विशेषाधिकार भंगाची (हक्कभंग) कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी हे प्रकरण विधानसभा विशेषाधिकार समितीकडे सुपूर्द केले आहे. तसेच या दोघांवर फौजदारी कारवाई करण्यात येत असल्याची माहिती नार्वेकर यांनी शुक्रवारी दिली...

कल्याण मधील दोन प्रमुख रस्त्यांच्या उभारणीसाठी २०१ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता !

कल्याण मधील दोन प्रमुख रस्त्यांच्या उभारणीसाठी २०१ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता !

कल्याण पूर्वेतील चेतना नाका ते नेवाळी नाका रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यात येणार असून यासाठी एमएमआरडीएने १२४.८७ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली असून लवकरच रस्त्याच्या कामाची निविदा काढली जाणार आहे. तर कल्याण पूर्वेतील काटेमानिवली, सिद्धार्थनगर, तीसगाव नाका हा यू टाइप रस्ता महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाकरिता एमएमएमआरडीएने ७६.८८ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली. रस्त्याच्या कामाचीही निविदा लवकरच काढली जाणार आहे. हा रस्ता झाल्याने कल्याण पूर्वेतील वाहतुकीला..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121