"श्रीरामाच्या अस्तित्वाचा पुरावा नाही, रामायण महाभारतात चांगले शिक्षण नाही", तामिळनाडूंच्या मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य

    03-Aug-2024
Total Views | 42

S.S Shivshankar And TSK Elongovan
 
 
 (Photo Credit : S.S. Shivshankar Fb Account)
 
चेन्नई (Shree Ram) : तामिळना़डूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी श्रीरामाच्या (Shree Ram) अस्तित्वावरच प्रश्न उपस्थित केले होते. हिंदू धर्म आणि सनातनी धर्म मलेरियाप्रमाणे नष्ट करण्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. अशातच कर्नाटक राज्याचे परिवहन मंत्री एसएस शिवकुमार यांनी श्रीरामाचा इतिहास आणि अस्तित्वावर सवाल उपस्थित केले. श्रीरामाचा कोणताही इतिहास किंवा पुरावा नसल्याचं ते म्हणाले.
 
तामिळनाडूतील भाजपचे नेते अन्नामलाई यांनी नेत्याच्या वक्तव्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तामिळनाडूचे कायदामंत्री एस रघुपती यांनी भगवान श्री राम यांना सामाजिक न्यायाचे ध्वजवाहक असल्याचे म्हटले. मात्र, आता काही दिवसांतच द्रमुकची स्मृती गेली आहे. त्यांनी दोन्ही मंत्र्यांना एकत्र बसून हे प्रकरण सोडवण्याचा सल्ला दिला होता.
 
२०२२ पासून, राजदंड चोलास यांच्या जयंतीला सरकारी कार्यक्रम साजरे केले जातात. त्यांनी बांधलेली मंदिरे, तांम्रपट आम्ही पुरावा म्हणून पाहतो, असे मंत्री म्हणाले. त्यानंतर त्यांनी श्रीरामावर (Shree Ram) भाष्य केलं आहे. प्रभू श्रीराम एक अवतार असतील तर अवतार हा कधीच जन्माला येत नाही. जर कोणी देव म्हणून जन्म घेतला तर तो अवतार नाही. ते म्हणाले की, रामायण आणि महाभारत हे तमिळ लोकांसाठी नाहीत.
 
 
 
यावेळी बोलत असताना द्रमुकचे नेते टीएसके एलांगोवन यांनी आपल्या मंत्र्यांनी केलेल्या विधानाची सारवासारव केली. राम हे देवमाणूस होते. त्यांनी रामाचे वर्णन कृष्णाचा अवतार असे केले. तर राम आणि कृष्ण हे दोघेही विष्णुचा अवतार असल्याचं म्हणाले. त्यानंतर एस.एस. शिवशंकर यांनी रामावर विश्वास ठेवू नये असे म्हटलेलं नसल्याचे एलागोवन यांनी सांगितलं. 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121