संजय राऊत आणि अनिल देशमुखांची कुख्यात गुंडासोबत पार्टी; नितेश राणेंचा गौप्यस्फोट

    19-Aug-2024
Total Views | 47
anil deshmukh sanjay raut party with mafia


मुंबई :    नागपूरमधील कुख्यात गुंड गौतम भटकर याच्यासोबत खासदार संजय राऊत आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पार्टी झाडल्याचा गौप्यस्फोट भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. त्यासंदर्भातील फोटोपुरावे त्यांनी सोशल मीडियावर सादर केले आहेत.

भटकर हा कुख्यात गुंड असून, तो गँगस्टर संतोष आंबेकर याचा साथीदार आहे. २०१६ मध्ये गँगस्टर संतोष आंबेकर, गौतम भटकर आणि त्याच्या टोळीविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली होती. मोक्का प्रकरणात तो अनेक दिवस फरार होता. त्यानंतर तो न्यायालयात शरण आला होता. या पार्टीविषयी माहिती देताना नितेश राणे म्हणाले, "हे आहेत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाराष्ट्राचा भोंगा संज्या. दोघेही बेलवर बाहेर आहेत. नागपुरात जेवणाचा आनंद घेत आहेत. हरकत नाही. पण बेलवरचे हे दोन्ही आरोपी कुणासोबत जेवतात तेही पहा. गौतम भटकरसोबत, असा हल्लाबोल नितेश राणेंनी केला आहे. 

"हा भटकर कुख्यात संतोष आंबेकर टोळीचा म्होरक्या. या भटकरवर मोक्का सुद्धा लागला, बलात्कार केला आणि त्याच तरुणीसोबत लग्न करून सुटला. खंडणीचे तर कित्येक गुन्हे त्याच्यावर आहेत. आता अशा गुन्हेगारांसोबत रहाल तर जेलमध्ये जावेच लागणार. मग भाषणात कशाला सांगता, नागपूरच्या माणसामुळे आम्हाला जेलमध्ये जावे लागले?", असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121