“मला वाइल्ड कार्ड एन्ट्री द्या!” अभिनेत्रीची 'बिग बॉस'कडे मागणी, म्हणाली, "बाई आणि बुगु बुगुच्या कानाखाली..."

    14-Aug-2024
Total Views | 114

big boss  
 
 
 
मुंबई : कलर्स मराठी वाहिनीवरील मराठी बिग बॉसचा पाचवा सीझन सध्या विशेष गाजत आहे. पहिल्या दिवसांपासूनच घरातील सदस्यांमध्ये वाद विवाद होताना दिसत आहेत. पण या सगळ्या सदस्यांपैकी निक्की तंबोळी आणि जान्हवी किल्लेकर यांची तर सगळ्याच सीमा ओलांडल्या आहेत. अगदी क्षुल्लक कारणांवरुन निक्की आणि तिची टीम घरात वाद घालताना दिसतात. बऱ्याचदा निक्की घरातील बरेच नियमही मोडताना दिसते. यावरुन सोशल मीडियावरही तिला चांगलंच ट्रोल केलं जात आहे. तर आता एका मराठी अभिनेत्रीने निक्कीच्या कानाखाली लगावण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री देण्याची मागणी अभिनेत्री अनघा अतुल हिने केली आहे.
 
अनघा अतुलने तिच्या इन्स्टावर स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये तीने लिहिले आहे की, "बिग बॉस मराठी एक विनंती आहे. एक दिवस वाइल्ड कार्ड एन्ट्री द्या. बाई आणि बुगु बुगुच्या श्रीमुखात लगावायची आहे". या स्टोरीमधून तिने निक्की तांबोळीचा बाई म्हणून उल्लेख केला आहे. तर बुगु बुगु म्हणत तिचा रोख नक्कीच जान्हवी किल्लेकरवर दिसून येत आहे.
 

anagha atul  
 
दरम्यान, या आठवड्यात सदस्यांना घरातील दोन चिमुकल्या पाहुण्यांना सांभाळण्याची आणि त्यांचं मनोरंजन करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. या छोट्या पाहुण्यांचा सांभाळ करताना घरातील सदस्यांची दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी पुन्हा एकदा निक्कीचा तोंडावरील ताबा सुटल्यामुळे तिने थेट वर्षा उसगांवकर यांच्या मार्तृत्वार चुकीच्या भाषेत विधान केलं आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121