मुंबई : प्रेक्षकांवर हिंदी पाठोपाठ दाक्षिणात्य चित्रपटांची अधिक जादू पाहायला मिळते. त्यातही कन्नड चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप उमटवली असून त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘कांतारा’. दिग्दर्शक-अभिनेता ऋषभ शेट्टी यांच्या २०२२ मध्ये आलेल्या 'कांतारा' चित्रपटाने नवा इतिहास रचला. बॉक्स ऑफिसवरही तुफान कमाई करणाऱ्या कांताराचा दुसरा भाग लवकरच येणार आहे. ‘कांतारा : लेजंड चॅप्टर १’ हा खरंचर कांताराचा सीक्वेल नसून प्रीक्वल असणार आहे. चित्रपटाच्या शुटींगबद्दल एक नवी माहिती समोर आली आहे. जाणून घेऊयात...
कांताराच्या दुसऱ्या भागासाठी ऋषभ शेट्टी गेल्या काही वर्षांपासून काम करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'कांतारा २'चे अर्धे शूटिंग पूर्ण झाले असून आता हळूहळू ही वाटचाल शेवटच्या टप्प्याकडे येत आहे. कांताराच्या पहिल्या भागाचे बजेट जवळपास १६ कोटी होते आणि आनंदाची बाब म्हणजे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३५० कोटींचा टप्पा पार केला होता. दरम्यान, आता दुसऱ्या भागाचे बजेट जवळपास १०० कोटी असेल असे सांगितले जात असून हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होईल असे सांगण्यात येत आहे.
‘कांतारा’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत ऋषभ शेट्टीने अभिनय देखील केला होता. त्याच्यासोबत या चित्रपटात सप्तमी गौडा, किशोर, अच्युथ कुमार आणि प्रमोद शेट्टी यांच्यासह अनेक प्रभावी कलाकार आहेत.