मुंबई : मायक्रोसॉफ्ट क्लाउडमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे सबंध जगाला मोठा फटका बसला. जगभरातील बँकिंग सिस्टमसह विमान वाहतूक सेवेलाही मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, मायक्रोसॉफ्टमधील तांत्रिक त्रुटीचा विविध यंत्रणांच्या सर्व्हरवर परिणाम दिसून आला. विमानसेवा प्रदान करणारी अग्रणी कंपनी इंडिगोला देखील यामुळे प्रभावित झाली.
मायक्रोसॉफ्ट आउटेजमुळे इंडिगो कंपनीने ९३ उड्डाणे रद्द केली असून आता पहाटेपासून सिस्टम कार्यान्वित झाली आहे. विशेष म्हणजे क्लाउड डाऊन झाल्यामुळे भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलियासह जगभरातील शेकडो उड्डाणे रद्द करण्यात आली असून अनेकांच्या वेळेत बदल करण्यात आला. दुसरीकडे, देशात एअर इंडिया विमानतळ प्रणालीतील बिघाडामुळे त्यांची काही उड्डाणे उशीर झाली आहेत.
मायक्रोसॉफ्ट आऊटेजचा परिणामामुळे अख्खं जग ठप्प झाले होते. याचे कारण म्हणजे जगभरातील सर्व बँका, व्यवसाय, विमान कंपन्या याच क्लाउड सर्व्हरवर अवलंबून आहेत. मायक्रोसॉफ्ट क्लाउड डाऊन झाल्यामुळे भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलियासह जगभरातील शेकडो उड्डाणे रद्द करण्यात आली असून अनेकांच्या वेळेत बदल करण्यात आला.
"उड्डाण वाहतूक आता सुरळीत चालू आहे. आऊटेजमुळे व्यत्यय आल्याने तो हळूहळू दूर होत आहे. आम्ही सर्व समस्या सोडवल्या जाण्याची अपेक्षा करत आहोत," असे नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी 'एक्स'वर सांगितले. इंडिगोला १९२ उड्डाणे आउटेजमुळे रद्द करावी लागली. भारतातील सर्वात मोठ्या विमान वाहतूक कंपनीने नियोजित ९३ सेवा रद्द केल्या आहेत.