पंढरपुरात टोकन दर्शन सुरु होणार , मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
17-Jul-2024
Total Views | 50
पंढरपूर :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरासाठी आज मोठी घोषणा केली. मंदिरामध्ये टोकन दर्शन व्यवस्था करणार, तर या दर्शन व्यवस्थेसाठी राज्य सरकारकडून तब्बल १०३ कोटींचा निधी देणार , अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी पंढरपूरमधील विठ्ठल -रुक्मिणी मंदीरातील सभामंडपात केली. तर लवकरात-लवकर हा निधी राज्य सरकारकडून मिळेल.
आज विठ्ठल -रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखोने भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत. तर वारकऱ्यांच्या गर्दीने संपूर्ण पंढरपूर गजबजले आहे. तर पहाटेपासूनच विठ्ठल -रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनाला सुरुवात झाली आहे. विठ्ठवलाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत.
दरम्यान ,टोकन दर्शन व्यवस्थेनंतर भाविकांना केवळ दोन तासात वठुरायाचे पदस्पर्श दर्शन घेता येणार आहे. तर गोपाळपूर रोडवरील ठिकाणी दर्शन मंडप उभारुन टोकन व्यवस्था केली जाणार आहे. सध्या विठ्ठल दर्शनासाठी १७ ते १८ तास लागत आहेत टोकन दर्शन व्यवस्था सुरु झाल्यावर भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.