आषाढीनिमित्त वडाळा येथे वाहतुकीत बदल

प्रति पंढरपूरला भाविकांच्या होणाऱ्या गर्दीमुळे वाहतुकीत बदल

    16-Jul-2024
Total Views | 40
wadala
 
मुंबई : आषाढी एकादशी निमित्त मुंबईतील वडाळा येथील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी नित्यनेमाने भाविक मोठी गर्दी करतात. यापार्श्वभूमीवर, वडाळा येथील रस्ता वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.येत्या बुधवार, दि. १७ जुलै रोजी आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. आषाढी एकादशीच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर वडाळा येथील विठ्ठल मंदिराजवळ मोठ्या संख्येने भाविक जमा होतील, असे गृहित धरुन मुंबई वाहतूक पोलिसांनी एक अधिसूचना जारी केली आहे.
 
ज्यात नवीन वाहतुकीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच येथील मार्ग बंद करताना दुसऱ्या मार्गाने वाहतूक वळवली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि भाविक आणि पादचाऱ्यांना सहज आणि सुरक्षितपणे ये-जा करण्यासाठी हे वाहतूक बदल करण्यात आले आहे. हे नियम मंगळवार, दि. १६ जुलै सायंकाळी ६ वाजेपासून बुधवार, दि. १८ रोजी सकाळी ८.०० वाजेपर्यंत अंमलात राहतील, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.
 
प्रवेश बंद आणि वाहतूक बदल
दादर टी.टी. जंक्शन ते कात्रक रोड जंक्शन पर्यंतचा टिळक रोड वाहतूकीस बंद राहील. टिळक ब्रिजवरून येणारी वाहतूक खोदादाद/दादर टी.टी. सर्कल पासून डॉ.बी. ए. रोडवर उत्तर वाहिनीने रुईया जंक्शन मार्गे वळविण्यात येईल. कात्रक रोड हा डेव्हीड बॅरेटो सर्कलपासून जी. डी. आंबेकर मार्ग व टिळक रोड जंक्शनपर्यंत वाहतूकीस बंद राहील. सरफरे चौकाकडून उत्तरेकडे येण्यासाठी जी.डी. आंबेकर (जी.डी. आंबेकर मार्ग व नायगांव क्रॉस रोड अथवा मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय मार्ग जंक्शनपासून कात्रक रोडपर्यंत) हा वाहतूकीसाठी बंद राहील. सहकार नगर गल्लीपासून टिळक रोड विस्तारित हा (पूर्वेकडून पश्चिमेकडे) वाहतूकीकरीता बंद राहीललेडी जहाँगीर रोड जंक्शन पासून व कात्रक रोड जंक्शनपर्यंत पारशी कॉलनी नं. १३ व रोड नं. १४ हे प्रवेश बंद वाहतूकीस बंद राहतील. मंचेरजी जोशी मार्ग जंक्शनपासून ते कात्रक रोड जंक्शनपर्यंत दिनशॉ मार्ग हा वाहतूकीस बंद राहील.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121