काँग्रेस कार्यसमितीकडून राहुल गांधींची लोकसभेच्या पक्षनेते पदी निवड : सूत्र

    08-Jun-2024
Total Views | 29
Rahul Gandhi news

नवी दिल्ली :
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची काँग्रेस कार्यकारणी सदस्यांनी लोकसभेच्या पक्षनेते पदी निवड करावी असा ठराव मंजूर केला आहे. काँग्रेस कार्यसमितीची दि. ८ जून रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. या बैठकीला काँग्रेस कार्यसमितीच्या सदस्यांसह, सर्व राज्यातील प्रदेशाध्यक्ष,संसदीय पक्षाचे नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते.

दरम्यान सकाळपासून काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत राहुल गांधींना विरोध पक्षनेते पद मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. कारण इंडी आघाडीत लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सर्वात जास्त जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसकडे विरोधी पक्षनेते पद जाईल, अशी चर्चा होती. पण आता एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधींची लोकसभेत काँग्रेस पक्षनेते म्हणून निवड करण्यात आलेली आहे.


 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121