सुशांतचंच घर का निवडलं? अदा शर्माने सांगितलं कारण, म्हणाली, “या घरात मला...”

    03-Jun-2024
Total Views | 235

adah sharma 
 
 
मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आकस्मिक निधनातून अजूनही हिंदी इंडस्ट्री सावरली नाही आहे. आजही अनेक कारणांमुळे तो चर्चेत असतो आणि त्याच्याविषयी बोललं जातं. नुकतचं अभिनेत्री अदा शर्मा त्याच्या बांद्रातील घरात भाडेकरु म्हणून राहात आहे. तिने सुशांत सिंग राजपूतचेच घर का निवडले याबद्दल खुलासा केला आहे. अदा शर्मा चार महिन्यांपूर्वीच सुशांतच्या घरी शिफ्ट झाली असून सध्या ती तिथे पुर्णपणे सेटल झाली आहे.
 
अदा शर्माने नुकतीच 'बॉम्बे टाइम्स'ला मुलाखत दिली. यावेळी सुशांतच्या फ्लॅटवर गेल्यानंतर तिला कसे वाटले हे तिने सांगितले. अदा म्हणाली की, 'मी चार महिन्यांपूर्वी या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले. पण 'बस्तर' आणि त्यानंतर 'द केरला स्टोरी'च्या ओटीटी प्रदर्शनात मी व्यस्त होते. त्यानंतर मी काही काळ मथुरेच्या हत्ती अभयारण्यात घालवला. आता मला सुट्टी मिळाली आणि मग मी इथेच स्थायिक झाले”. हेच घर का? या प्रश्नाचे उत्तर देताना ती म्हणाली, “आतापर्यंत मी पाली हिल (वांद्रे) येथे फक्त एकाच घरात राहिले होते. तिथून बाहेर पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. मी या जागेबद्दल खूप संवेदनशील आहे आणि हे ठिकाण मला सकारात्मक व्हायब्स देते. केरळ आणि मुंबईतील आमची घरे झाडांनी वेढलेले आहे. आम्ही पक्ष्यांना खायला घालतो. त्यामुळे, मला घरासमोर सुंदर दृश्य असेल आणि पक्ष्यांना खायला घालायला पुरेशी जागा हवी होती”.
 
पुढे ती म्हणाली की, “मी कधीही लोकांची पर्वा केली नाही आणि नेहमी माझ्या मनाचे ऐकले. त्यामुळे सुशांत सिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होण्याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नव्हती”. अदाने सुशांतचं घर ५ वर्षांसाठी भाड्याने घेतले असून ऑक्टोबर २०२३ मध्ये भाडेतत्त्वाचा करार केला गेला होता.
अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121