मुंबई: आंतरराष्ट्रीय स्तरावरील दबावात नियंत्रण आल्याने कालपासून सोन्याच्या निर्देशांकात घसरण झाली असल्याने अखेरीस निवडणूक निकालपूर्व सोने स्वस्त झाले होते. मध्यपूर्वेतील दबाव शांत झाल्याने, गाझापट्टीमधील अमेरिकेच्या सिझफायरला इस्त्राईलने मान्यता दिल्याने अखेरीस बाजारात शांतता प्रस्थापित झाली आहे. बाजारातील अमेरिकन पीसीई (Personal Consu mption Expenditure) आकडे एप्रिलमध्ये थंड झाल्यानंतर बाजारात ही घसरण झाली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील युएस गोल्ड स्पॉट निर्देशांकात सकाळी १२ वाजेपर्यंत ४.८५ टक्क्यांनी घसरण झाली आहे. युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात ३.१५ टक्क्यांनी घसरण झाली होती. याचा आशिया बाजारात फरक पडल्यानंतर भारतातील एमसीएक्स (MCX) निर्देशांकात ०.६० टक्यांनी घसरण होत सोने ७१४०० पातळीवर पोहोचले आहे.
'गुड रिटर्न्स' या संकेतस्थळावरील माहितीनुसार भारतातील २२ कॅरेट सोन्याच्या प्रति १० ग्रॅम दरात ४०० रुपयांनी घट झाली असून सोने ६६१०० पातळीवर पोहोचले आहे तर २४ कॅरेट सोन्याच्या प्रति १० ग्रॅम दरात ४४० रुपयांनी घसरण होत सोने ७२११० रुपयांवर पोहोचले आहे. मुंबईतील सोन्याच्या दरातदेखील ४०० ते ४४० रुपयांनी सोने प्रति १० ग्रॅम स्वस्त झाले होते. चांदीच्या एमसीएक्स निर्देशांकात १.०५ टक्क्यांनी घसरण झाल्याने भारतीय बाजारात चांदीदेखील स्वस्त झाली आहे. चांदीचे दर एक किलोमागे ७०० रुपयांनी स्वस्त झाली आहे.