शेअर बाजार अपडेट: बाजारात सकाळी उसळी सेन्सेक्स २६३.६९ व निफ्टी ७८.०५ अंशाने उसळला आशिया बाजारातही वाढ

    18-Jun-2024
Total Views | 16

Stock Market
 
मुंबई: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकाने मोठी उसळी मारली आहे. काल बकरी ईदच्या निमित्ताने बाजार बंद होते. आज सकाळच्या सत्रात पुन्हा सेन्सेक्स निफ्टीने आघाडी घेतली आहे. पुन्हा एकदा शेअर बाजाराने आशियाई बाजारातील वाढीमुळे पुन्हा एकदा उसळून बाजार रिबाऊंड झाले आहे. सेन्सेक्स २६३.६९ अंशाने वाढत ७७२५६.६९ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० हा ७८.०५ अंशाने वाढत २३५४३.६५ पातळीवर पोहोचला आहे.
 
सेन्सेक्स बँक निर्देशांक २९५.०९ अंशाने वाढत ५७१५९.८६ पातळीवर पोहोचले आहे तर निफ्टी बँक निर्देशांक २९२.७० अंशाने वाढत ५९२९४.७० पातळीवर पोहोचले आहे. बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.३२ व ०.७३ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर एनएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.४२ व ०.९४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेषतः आज बँक निर्देशांकात ०.५९ व ०.५९ टक्क्यांनी वाढ झाल्याने बाजारातील निर्देशांकाला पाठिंबा मिळाला आहे.
 
आज पुन्हा शनिवारनंतर सकाळच्या सत्रात रॅली झाल्याने अखेरच्या सत्रात पुन्हा वाढ होईल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात बँक (०.६४%), प्रायव्हेट बँक (०.७६%), आयटी (०.७५%) पीएसयु बँक (०.५६%), कनज्यूमर ड्युरेबल्स (१.३६%) समभागात वाढ झाली आहे तर मिडस्मॉलकॅप हेल्थकेअर (०.७५%), हेल्थकेअर (०.८४%), फार्मा (०.६६%) समभागात घसरण झाली आहे.
 
बीएसईत विप्रो, टायटन कंपनी, पॉवर ग्रीड, एम अँड एम, इन्फोसिस, एसबीआय, बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, एक्सिस बँक, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, लार्सन, आयटीसी, जेएसडब्लू स्टील, एचसीएलटेक, रिलायन्स या समभागात वाढ झाली आहे तर मारूती सुझुकी, अल्ट्राटेक सिमेंट, भारती एअरटेल, कोटक महिंद्रा, टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह, सनफार्मा, नेस्ले, टीसीएस, एशियन पेंटस या समभागात घसरण झाली आहे.
 
एनएसईत सकाळी विप्रो, टायटन कंपनी,पॉवर ग्रीड, श्रीराम फायनान्स, एम अँड एम, अदानी एंटरप्राईज, इन्फोसिस, अदानी पोर्टस, आयसीआयसीआय बँक, बीपीसीएल, एक्सिस बँक, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, आयशर मोटर्स, सिप्ला, लार्सन, आयटीसी, एचयुएल, जेएसडब्लू स्टील, एचसीएलटेक, रिलायन्स या समभागात वाढ झाली आहे तर मारुती सुझुकी, अल्ट्राटेक सिमेंट, डॉ रेड्डीज, ग्रासीम, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, भारती एअरटेल, टाटा स्टील,टाटा मोटर्स, कोटक महिंद्रा, अपोलो हॉस्पिटल, बजाज फिनसर्व्ह, एशियन पेंटस, नेस्ले, हिंदाल्को, हिरो मोटोकॉर्प, टीसीएस, ओएनजीसी, कोल इंडिया, ब्रिटानिया या समभागात घसरण झाली आहे.
 
आजच्या सकाळ सत्रातील बाजारातील हालचालींवर व्यक्त होताना कोटक सिक्युरिटीजचे हेड ऑफ रिसर्च श्रीकांत चौहान म्हणाले,' गेल्या आठवड्यात, बेंचमार्क निर्देशांकांनी श्रेणी-बाउंड हालचाल दर्शविली, निफ्टी ट्रेडिंग ०.७५ % वर आणि सेन्सेक्स २९९ अंकांनी वाढला. रियल्टी निर्देशांक 5% पेक्षा जास्त वाढला, तर आयटी निर्देशांक १.६ % ने घसरला. तांत्रिक दृष्टीकोनातून, गेल्या आठवड्याच्या प्रभावी रॅलीनंतर बाजाराने श्रेणीबद्ध हालचाली दर्शवल्या.
 
बाजाराला सातत्याने २३२०० -२३३००/७६३००-७६५५० दरम्यान समर्थन पातळी आढळून आली, तर काही नफा बुकिंग २३४५०-२३४९०/७७०००-७७१०० वर दिसून आली. सध्या, बाजार सकारात्मक एकत्रीकरणातून जात असल्याचे दिसते आणि जोपर्यंत ते २३२००/७६३०० च्या वर राहील तोपर्यंत तेजीची भावना कायम राहण्याची शक्यता आहे. वरच्या बाजूस, २३५००/७७१५० ब्रेकआउटनंतर बाजार २३६००-२३७५०/७७६००-७८००० च्या दिशेने वाढण्याची अपेक्षा आहे. तथापि, २३२००/७६३०० च्या खाली आल्यास पॅटर्नमध्ये बदल होऊ शकतो. तसे झाल्यास, ट्रेडर्स लाँग पोझिशनमधून बाहेर पडण्याचा विचार करू शकतात, कारण २३०५०-२३०००/७६०००- ७५७०० कडे जाणे अधिक संभाव्य होऊ शकते. इंट्राडे मार्केट पॅटर्न दिशाहीन आहे, त्यामुळे लेव्हल-आधारित ट्रेडिंग हे ट्रेडर्ससाठी एक आदर्श धोरण आहे. २३६०० आणि २३७०० पातळी दरम्यान लांब पोझिशन्स कमी करण्याचा सल्ला दिला जातो.
 
बँक निफ्टी दैनंदिन आणि इंट्राडे चार्टवर उच्च तळाची स्थापना करत आहे, परंतु ५०३०० च्या ब्रेकआउटनंतरच नवीन अपट्रेंड रॅली शक्य आहे. ५०३०० च्या वर, तो ५०८००-५१००० च्या दिशेने वाढू शकतो, तर ४९५०० च्या खाली, वरचा ट्रेंड कमकुवत होईल.'
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121