नवी दिल्ली : ओडिसा विधानसभेत दि. १८ जून रोजी लोकशाहीचा उत्सव साजरा होताना दिसला. बीजेडी नेता आणि माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी त्यांना हरवणाऱ्या भाजपच्या लक्ष्मण बाग यांची फक्त भेट न घेता त्यांना शुभेच्छा दिल्या. नवीन पटनायक म्हणाले, अच्छा! तर तुम्ही मला हरवले? दरम्यान नवीन पटनायक हे कांटाबांजी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.
नवीन पटनायक गेल्या २४ वर्षांहून अधिक काळ ओडिसाचे मुख्यमंत्री होते. अशा परिस्थितीत विधानसभा निवडणुकीत त्यांना हरवणे ही महत्त्वपुर्ण गोष्ट आहे. लक्ष्मण बाग यांना ९० हजार ८७६ मते मिळाली आहेत. तर नवीन पटनायक यांना ७४ हजार ५३२ मतांनी पराभूत झाले आहेत. ज्यामुळे १६ टक्के मताधिक्य मिळवत बाग यांनी पटनायक यांचा पराभव केला आहे. दरम्यान गंजाम जिल्ह्याच्या हिन्जिली विधानसभा मतदारसंघातून नवीन पटनायक लागोपाठ सहाव्यांदा विजयी झाले आहेत.
दरम्यान नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला. तेव्हा लक्ष्मण बाग आणि नवीन पटनायक समोरासमोर आले. विधानसभेत पटनायक यांनी प्रवेश करताच लक्ष्मण बाग उभे राहिले आणि आपला परिचय दिला. ज्यानंतर पटनायक यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. लक्ष्मण बाग यांनी देखील हात जोडून ज्येष्ठ नेते पटनायक यांना अभिवादन केले. ओडिसात ७८ जागा जिंकत भाजपने पहिल्यांदा बहुमत प्राप्त केले आहे. तर दुसरीकडे १४७ पैकी ५१ जागांवर बीजेडीचा पराभव झाला आहे.