मुंबई: आज सकाळी इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात वाढ झाली आहे.आठवड्याची सुरुवात तेजीने झाल्याने बाजारात शेवटच्या सत्रापर्यंत सकारात्मक वातावरण राहील का प्रश्न महत्वाचा ठरणार आहे. सेन्सेक्स निर्देशांक २११.४६ अंशाने वाढत ७४०९२.६६ पातळीवर स्थिरावला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक ८.६५ अंशाने वाढत २२४८४.५० पातळीवर पोहोचला आहे.
दोन्ही बँक निर्देशांकातही सकाळी तुलनात्मकदृष्ट्या मोठी वाढ झाली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांक ३०६.०८ अंशाने वाढत ५५७१५.१७ पातळीवर व निफ्टी बँक निर्देशांक १७६.७५ अंशाने वाढत ४९१००.३० पातळीवर पोहोचला आहे. मुख्यतः बँक निर्देशांकात अनुक्रमे ०.५५ व ०.३६ अंशाने वाढ झाल्याने बँक निर्देशांकात आज रिकव्हरी झाली असे म्हणता येईल. शुक्रवारी निवडणुकीनंतर कररचनेत बदल होणार अशा अफवा पसरल्या होत्या मात्र याबाबत खुद्द केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शक्यता खोडून केवळ अफवा असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे बाजारातील गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास बळावला असल्यानं आज गुंतवणूकदार कंपन्या तिमाहीचा कॉर्पोरेट निकालाकडे लक्ष देतात का नफा बुकिंगकडे आपला मोर्चा वळवतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मात्र सौदी अरेबियाने आशियाई बाजारातील क्रूड तेलाच्या भावात वाढ करण्याचे ठरवले असल्याने भारतातील कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. ओपेक देशांतर्गत उत्पादनातही घट झाल्याने यांचा फटका देशात बसू शकतो. रुपयांच्या हालचालींवर देखील गुंतवणूकदारांचे लक्ष राहणार आहे.
बीएसई (BSE) मध्ये मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे १.१९ व १.१५ टक्क्यांनी घट झाली आहे. एनएसई (NSE) मध्ये मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये १.१० व १.७९ टक्क्यांनी घट झाली आहे. आज मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये घसरण झाली असली तरी तुलनेने लार्जकॅप वधारले गेल्याने बाजारातील निर्देशांक वधारला आहे.
निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक (Sectoral Indices) मध्ये संमिश्र प्रतिसाद असताना हा प्रतिसाद समभाग विशेष राहिला आहे. सर्वाधिक वाढ निफ्टी आयटी (१.१३%), प्रायव्हेट बँक (१.०४ %) समभागात झाला असून याशिवाय रिअल्टी (०.८२%) फायनाशियल सर्विसेस (०.२१ %) समभागात झाली आहे तर सर्वाधिक नुकसान पीएसयु बँक (३.९३%) कनज्यूमर ड्युरेबल्स (२.१३%) मिडिया (१.८६%) तेल गॅस (१.३९%) समभागाची सुरूवात नुकसानीत झाली आहे.
आज कुठले समभाग निरिक्षणासाठी महत्वाचे आहेत?
तज्ञांच्या मते टायटन, पेटीएम, डी मार्ट, ब्रिटानिया, सिप्ला समभागातील हालचाल पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.