मुंबई: कामाच्या ठिकाणी सर्वांगीण विकास, विविधता, प्रगती ही भारतीय नोकरदार वर्गाची पसंती असल्याचे एका नव्या अहवालात स्पष्ट झाले आहे. सुधारित धोरणे, कौशल्य विकास, लवचिकता याला भरती करणारा कर्मचारी पसंती देत आहेत असे मॅनपॉवर ग्रुपचा अहवालात म्हटले आहे.
या नवीन अहवालातील माहितीप्रमाणे, ५४ टक्के भारतीय कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या विविधता, समानता ,अंतर्भूत, संबंधित (Diversity, Equity, Inclusion, Belonging (DEIB) या तत्वांच्या पुढाकाराला कर्मचाऱ्यांनी पसंती दर्शविली आहे. या सर्व्हेचा नमुना म्हणून ३१५० कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण केले गेले होते.
यातील आणखी महत्वपूर्ण निरीक्षण समोर आलेले आहे की, या वैविध्यपूर्ण प्रतिभा टिकवून ठेवण्यासाठी आणि कारकीर्द सुरक्षित करण्यास मदत करण्यासाठी अंतर्गत नेतृत्व विकास कार्यक्रम सर्वात प्रभावी आहेत असे देखील समोर आले आहे.ही तत्वे पाळत असलेल्या क्षेत्रात आयटीचा प्रथम क्रमांक आला असून त्यानंतर हेल्थकेअर व लाईफ सायन्स,फायनाशिंयल, रियल इस्टेट यांचा क्रमांक लागला आहे.
या अहवालावर प्रतिक्रिया देताना, 'भारतातील लैंगिक वैविध्य जगभरातील सर्वोत्कृष्ट आहे, आणि, कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग वेगाने वाढत आहे हे पाहणे उत्साहवर्धक आहे. संस्थांनी प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक स्तरावर महिलांना नियुक्ती देणे अनिवार्य करून त्यांची नियुक्ती धोरणे बदलली आहेत' असे मॅनपॉवर ग्रुप इंडिया आणि मिडल ईस्टचे व्यवस्थापकीय संचालक संदीप गुलाटी म्हणाले आहेत.
तसेच या अहवालात आजही महिलांचे उच्च पदांवर प्रतिनिधित्व कमी आहे. त्यामुळे आगामी काळात नियोक्तांना कर्मचाऱ्यांवर महत्वपूर्ण कामगिरी करण्यासाठी व प्रभाव पाडण्यासाठी यामध्ये सर्वात मोठी संधी असल्याचे म्हटले आहे.सर्वेक्षणात पुढे नमूद करण्यात आले आहे की ८० टक्के नियोक्ते म्हणाले की तंत्रज्ञान लवचिकता वाढवते आणि लैंगिक समानतेला प्रोत्साहन देते, ७७ टक्क्यांनी तंत्रज्ञानाच्या प्रगतीने या कारणास समर्थन दिले आहे.
गुलाटी यांनी 'अधिकाधिक महिला श्रमशक्तीमध्ये जोडल्या गेल्यास भारताची क्षमता अधिक जलद विकास दराने पुढे जाण्याची क्षमता" यावर विश्वास व्यक्त केला. वेतन इक्विटीवर, अहवालात म्हटले आहे की, अर्ध्याहून अधिक (५८ टक्के)उत्तरदाते, अहवाल पे इक्विटी उपक्रम वेळापत्रकानुसार आहेत, तर उर्वरित ३२ टक्के शेड्यूलच्या मागे आहेत आणि १० टक्के कोणतेही पुढाकार नाहीत.'
या अहवालातील माहितीप्रमाणे, लिंग समानतेत आगामी दोन वर्षांत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. तरीदेखील आतापर्यंत च्या २१ टक्के तुलनेत आगामी काळात केवळ ३८ टक्के लिंग समानता शक्य होणार आहे.अहवालात कर्मचाऱ्यांना विविधता, प्रगती, हेतू, प्रतिभेतील विविधता, लिंग भेद या विषयावर प्रश्न विचारले गेले होते.