टेलिकॉम कंपन्यांना सरकारचा हा ' आदेश'

आता बनावट फोन येणे बंद होणार

    27-May-2024
Total Views |

Telecom
 
 
मुंबई: आता टेलिकॉम विभागाने टेलिकॉम कंपन्यांना बनावट कॉल रोखण्याचे आदेश दिले आहेत. म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन या सरकारी विभागाने टेलिकॉम ऑपरेटर अथवा टेलिकॉम सर्विस प्रोवायड (TSP) यांना आंतरराष्ट्रीय बनावट कॉल ग्राहकांना येऊ नयेत यासाठी उपाययोजना करण्यास सांगितले आहे. त्यामुळे याची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी करावी लागेल.
 
भारतात बसून आंतरराष्ट्रीय बनावट नंबरवरून कॉल करण्याचे प्रमाण वाढल्याने उपाययोजना म्हणून भारतीय टेलिकॉम विभागाने यासंदर्भात आदेश दिले आहेत. अनेकदा या नंबरवरून ग्राहकांना नाहक त्रास देण्याचे अथवा फसवण्याचे प्रमाण वाढल्याने हा मोठा निर्णय घेण्यात आला. याशिवाय प्रमाणात परदेशी सायबर गुन्हेगारांकडून भारतीय क्रमांकावरून फोन करण्याचे प्रमाण प्रकर्षाने वाढत आहेत. कॉलिंग लाईन आयडिंटी (CLI) चा गैरवापर करण्याचे प्रकार वाढल्याचे दिसून आले आहे.
 
DoT आणि Telecom Service Providers (TSPs) ने अशा आंतरराष्ट्रीय स्पूफ केलेले कॉल कोणत्याही भारतीय टेलिकॉम ग्राहकापर्यंत पोहोचण्यापासून ओळखण्यासाठी आणि ब्लॉक करण्यासाठी एक प्रणाली तयार केली आहे. आता TSP ला अशा इनकमिंग इंटरनॅशनल स्पूफ्ड कॉल्सना ब्लॉक करण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121