मुंबई तरुण भारत विशेष: घरबसल्या मतदान करून निवडणूकींचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स व ब्लॉकचेनचा वापर का करू नये?

    25-May-2024
Total Views | 34

AI and Blockchain
 

मुंबई तरुण भारत विशेष: घरबसल्या मतदान करून निवडणूकींचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स व ब्लॉकचेनचा वापर का करू नये?
 
मोहित सोमण
 
ए आयचा वापर निवडणूकीत होऊ शकतो का? प्रश्न विचित्र आहेना,पण उत्तर स्वाभाविक आहे हो कारण ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर महत्वाच्या क्षेत्रात होत असेल तर निवडणूकीत का नाही? हा प्रश्न पडतो. सामान्यांच्या आयुष्यात बदल करण्यासाठी जवळपास महत्वाच्या क्षेत्रात ए आय येणार आहे अथवा आलेले आहे.
 
जर ब्लॉकचेन व आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आपण उपयुक्ततेसाठी करणार असू तर घटत्या निवडणूक मतदानाला पर्याय म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर निवडणूकीत होऊ शकला तर एक मोठी उपयुक्तता ठरणार आहे. अनेक एक मोठा वर्ग अनेक कारणांमुळे लोक मतदान करू शकत नाही अशातच ऑनलाईन मतदान केल्यास मतदानाचा टक्का वाढू शकतो. याचा अर्थ पारंपारिक मतदान बंद करा असे नाही. मात्र मतदारांना तंत्रज्ञानाच्या मदतीने मतदान आल्यास ही विन विन सिच्युएशन तयार होईल असे वाटते.
 
विशेषतः गेल्या काही वर्षांत आर्टिफिशियल इंटेलिजन्स व ब्लॉकचेनचे प्रस्थ वाढत असल्याने त्याचा औद्योगिक व प्रशासकीय सेवेत वापर झाल्यास भारताच्या दीर्घकाली कामकाजातून याचा फायदा मिळू शकतो. उदाहरणार्थ अनेकवेळा मतदार यादीतून मतदारांची नावे गायब होतात. अनेकदा अनेकांना नावे सापडत नाही अनेकदा नावात गोंधळ, पत्त्यात फरक पडतो. याशिवाय अनेकदा मतदानाच्या ठिकाणी अथवा मतदानावेळी केंद्र क्रमांकावर गोंधळ होतो.
 
ही अनागोंदी बाजूला सारण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स व ब्लॉकचेनचा वापर केल्यास कायमचा निश्चित रेकॉर्ड सरकारकडे राहू शकेल याशिवाय वेळोवेळी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून त्यात वेळोवेळी अपडेट अथवा बदल करणे देखील सोपे होऊ शकते. विशेष भारताच्या 'मिशन ए आय' मध्ये निवडणूकीचा समावेश केल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. अनेक वर्षांच्या इतिहासात ६० टक्क्यांहून अधिक सरासरी मतदान झालेले नाही. १९८४ व २०१४ वगळता कुठल्याही लोकसभेत सरासरी ६० टक्क्यांपेक्षा मतदान झालेले नाही. परिणामी एक मोठा वर्ग मतदानापासून वंचित आहे मग ते स्वतः ने मतदान करणे टाळले असो अथवा काही वैयक्तिक कारणांमुळे मतदानाची वेळ चुकलेली असो.
 
भविष्यात ही स्थिती बदलावी लागेल. निवडणूक वगळता बँकिंग क्षेत्र, सिक्युरिटीज, हेल्थकेअर, फार्मा, डिफेन्स, रिसर्च, एफएमसीजी, आयटी, प्रत्येक क्षेत्रात ब्लॉकचेन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांचा वापराला सुरुवात झाली आहे. मशिन लर्निंग, अँप डेव्हलपमेंट, स्किल डेव्हलपमेंट या प्रत्येक क्षेत्रात वापर वेगाने होत असल्याने भारतात आताच्या क्षणाला भारतात मोठ्या प्रमाणात आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात रोजगार निर्मिती वाढत आहेत. एका अहवालानुसार, भारतात आगामी काळात १.२ अब्ज डॉलर्सपर्यंत गुंतवणूक होऊ शकते.
 
मात्र केवळ निवडणूकीत सेंटर ऑफ मिडिया स्टडीजमधील एका अहवालातील माहितीप्रमाणे, १.३५ लाख कोटींचा खर्च झाला आहे. २०१९ लोकसभेत ६०००० कोटी खर्च झाले होते. प्रशासनातील वाढीव खर्च, आस्थापनेवरील वाढीव खर्च, याशिवाय इतर तरतूदीत अतिरिक्त खर्चामुळे सरकारवरील बोजा वाढतो. हा खर्च वाचवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर झाल्यास कागदपत्रे, प्रशासनवरील खर्च, इतर खर्च, पोलिस प्रशासनावरील खर्च, अथवा शासकीय खर्च यामध्ये खर्चात ४० ते ५० टक्के घट होऊ शकते. याशिवाय वेळ वाचेल ते वेगळे
 
परंतु हा निर्णय घेण्यासाठी प्रत्येक सरकारची अथवा राजकीय पक्षांची मानसिक तयारी आवश्यक आहे. हे लगेच होईल असे नाही परंतु जनजागृती करणारे आवश्यक आहे. मोदी सरकारने यापूर्वी एक राष्ट्र एक निवडणूक याच सिद्धांताने विधानसभा लोकसभा या दोन्ही निवडणूका एकत्र झाल्यास यामुळे अधिक पैशाची बचत होऊ शकते याशिवाय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केल्यास त्यात अचूकता देखील येऊ शकते.
 
मानवीय स्वभावानुसार विरोध अपेक्षित आहे परंतु यातील वास्तविकता पाहिल्यास अनेक कंगोरे आपणास लक्षात येतील. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे निवडणूकीत डेटा मध्ये सुसूत्रता येईलच तसे लोक घरी बसून सहजपणे मतदान करू शकतील. मे सारख्या महिन्यात उष्माघाताचा त्रास होऊन लोक मतदानाला बाहेर पडले नाही हे देखील चित्र आपण पाहिले तसे अनेक व्यक्तींनी मतदार यादीतून नाव गायब असल्याने मतदानाला मुकले ही देखील वस्तुस्थिती आहे.
 
अशा अनेक कारणांमुळे नव्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचा सोपस्कार देखील वाचू शकतो. मुळात जर तंत्रज्ञान पक्के असेल उदिष्ट पक्के असल्यास तर मतदानातील १ टक्के घोटाळेदेखील कमी होण्याची शक्यता आहे. याशिवाय ब्लॉकचेन तंत्रज्ञान अतिशय सुरक्षित असल्याने त्यात घोटाळा सायबर गुन्हेगारांना करणे शक्य नाही तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील तंत्रज्ञान वापरल्यास त्यातील शासकीय प्रक्रियांना वेग येऊ शकेल.
 
५ ट्रिलियन डॉलर्स भारताची अर्थव्यवस्था पोहोचवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा यामध्ये मोठा हातभार लागणार आहे.जर भारत अनेक लघु उद्योगात पैसे गुंतवणूक करून आणखी नवे तंत्रज्ञान विकसित करू शकतो तसे इतक्या महत्वाच्या निवडणूक प्रणालीत देश तंत्रज्ञानाचा का उपयोग करू शकत नाही? हा मूळ सवाल आहे.
 
विशेषतः १४० कोटींच्या नवभारतात ८० कोटी तरूण असतील तर भविष्याचा तंत्रज्ञानाचा विचार करत हे तंत्रज्ञान आणणे व्यवहारी ठरणार आहे. जेन झी नंतरची पिढी अधिक तंत्रज्ञान विकसित करणार आहे जर निवडणूकचा वेळेत विचार केल्यास देशाच्या तिजोरीमधील अनेक पैसे लोककल्याणकारी योजनेत सरकार खर्च करू शकते इतकाच उद्देश जनमानसात आहे.
 
लोकांची मानसिकता, राजकीय पक्षांचा प्रचारप्रसार, मतदारांची मानसिकता, तसेच निवडणूक प्रसिद्धीसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. याशिवाय निवडणूकीदरम्यान डीप फेकसाठी निवडणूक आयोगाला आळा घातला येईल. तसेच राजकीय पक्षांचा खर्चावर, बँक खात्यावर ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या युगात लक्ष देणे 'अकांऊटिबीलिटी ' ठरणार आहे. या अनेक कारणांमुळे निवडणूक पारदर्शक व सोपी होण्यासाठी तंत्रज्ञान कामी येईल.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121