शेअर बाजार अपडेट: बाजारात पुन्हा वाढ !सेन्सेक्स १३२.०१ अंशाने व निफ्टी १५.०५ अंशाने वाढला

रियल्टी, एफएमसीजी समभागात वाढ तर आयटी, बँक समभागात घसरण

    22-May-2024
Total Views | 22

Stock Market
 
 
मुंबई: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात वाढ झाली आहे. सकाळी गिफ्टी निर्देशांकात ५ अंशाने वाढ झाली होती.आज सकाळी ११ वाजेपर्यंत सेन्सेक्स निर्देशांकात १३२.०१ अंशाने वाढत ७४०९२.२९ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी निर्देशांक १५.०५ अंशाने वाढत २२५४४.१० पातळीवर पोहोचला आहे.मात्र सेन्सेक्स बँक निर्देशांकात ४११.०७ अंशाने घटत ५४५३१.०१ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक ३२९.२५ अंशाने घसरत ४७७१८.९५ पातळीवर पोहोचला आहे.
 
बीएसई (BSE) मिडकॅपमध्ये ०.२२ टक्क्यांनी घसरण झाली आहे तर स्मॉलकॅपमध्ये ०.११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एनएसई (NSE) मिडकॅपमध्ये ०.०८ टक्क्यांनी तर स्मॉलकॅपमध्ये ०.२३ टक्क्यांनी घट झाली आहे.निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Sectoral Indices) मध्ये घसरणीचा कल अधिक राहिला आहे. रियल्टी (१.३५%), एफएमसीजी (१.३६%), आयटी (०.५०%) समभागात वाढ झाली आहे. सर्वाधिक घसरण बँक (०.६२%), फायनांशियल सर्विसेस (०.५२%), आयटी (०.५०%),या समभागात झाली आहे.
 
कालपर्यंत अमेरिकन बाजारातील S & P 500, DoW Jones, NASDAQ या तिन्ही बाजारात रॅली झाली होती. काल सकाळच्या सत्रात भारतीय बाजारात घसरण दिसून आली होती मात्र अखेरच्या सत्रात सेन्सेक्स मध्ये घट होत निफ्टी मध्ये वाढ होऊन काही प्रमाणात बाजारातील स्थूलता दिसून आली होती. मात्र भारतीय कालच्या कंपनीच्या तिमाही निकाल चांगले आल्याने व पुन्हा भारतीय बाजारात हळूहळू विश्वास वाढल्याने सकाळच्या सत्रात आज वाढ झाली आहे. मात्र बँक निर्देशांकात मोठी घसरण झाल्याने संध्याकाळपर्यंत यातील बदल पाहणे महत्वाचे ठरणार आहे. प्रोजेक्ट फायनान्सिंगच्या नव्या तरतुदीवर बाजाराचे लक्ष असल्यामुळे बँक समभागात सावधतेचा इशारा मिळत आहे. तसेच मिड कॅप व स्मॉलकॅपमध्ये काय बदल होऊन बाजारात पातळी वाढते अथवा खाली जाते ते पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.
 
आज सकाळच्या सत्रात बीएसईत एचयुएल, रिलायन्स, इन्फोसिस, आयटीसी, अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंटस, एनटीपीसी, नेस्ले, लार्सन, टायटन कंपनी, मारूती सुझुकी, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, एचसीएलटेक, टाटा मोटर्स या समभागात वाढ झाली आहे तर एसबीआय, सनफार्मा, आयसीआयसीआय बँक, एक्सिस बँक, टाटा स्टील, जेएसडब्लू स्टील, कोटक महिंद्रा, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, बजाज फिनसर्व्ह, पॉवर ग्रीड या समभागात घसरण झाली आहे.
 
एनएसईत एचयुएल, कोल इंडिया, रिलायन्स, ब्रिटानिया, सिप्ला, इन्फोसिस, आयटीसी, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट, अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंटस, डॉ रेड्डीज, एनटीपीसी, नेस्ले, लार्सन, आयशर मोटर्स, टायटन कंपनी, मारूती सुझुकी, बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, टाटा मोटर्स या समभागात वाढ झाली आहे तर एसबीआय,बीपीसीएल, श्रीराम फायनान्स, अपोलो हॉस्पिटल, एक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, अदानी पोर्टस, हिंदाल्को, जेएसडब्लू स्टील, ग्रासीम, कोटक महिंद्रा, एचडीएफसी लाईफ,भारती एअरटेल, ओएनजीसी, अदानी एंटरप्राईज, पॉवर ग्रीड, एचडीएफसी बँक, बजाज ऑटो, डिवीज, विप्रो या समभागात घसरण झाली आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121