मुंबई: ओएनजीसी (ONGC) कंपनीच्या ३१ मार्च २०२३ मधील निव्वळ नफ्यात ७८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तिमाहीतील ६४७८.२३ कोटींच्या तुलनेत ११५२६.५३ कोटींपर्यंत वाढ झाली आहे. कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर मागील वर्षाच्या १.६४ लाख कोटींच्या तुलनेत १.६६ लाख कोटींवर वाढ झाली आहे.
कंपनीच्या ईबीआयटीडीएमध्ये (इतर खर्च कर पूर्व नफा) मागील वर्षाच्या तिमाहीतील १५७५२ कोटींच्या तुलनेत यावर्षीच्या तिमाहीत २५७७२ कोटींवर पोहोचला आहे. कंपनींच्या कामकाजातील खर्चात (Operational Cost) मध्ये १२ टक्क्यांनी घट होत १५४५६ कोटीने घट झाली आहे. इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) कंपनीच्या नफ्यात १ टक्क्यांनी वाढ होत नफा ४०४२६ कोटींवर पोहोचला आहे.
चौथ्या तिमाहीत कंपनीच्या कच्च्या तेलाच्या उत्पादनात २.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र गॅस उत्पादनात चौथ्या तिमाहीत ३ टक्क्यांनी घट झाली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ओएनजीसीने ३७००० कोटींचा भांडवली खर्च (Capex) केला होता जोमागील वर्षी ३०२०८ कोटी करण्यात आला होता.कंपनीच्या संचालक मंडळाने प्रत्येक समभागावर २.५० रुपये लाभांश (Dividend) सूचवला आहे याबाबत अंतिम निर्णय आगामी भागभांडवल धारकांच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे.