बीएसईतील मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.८३ व ०.९० टक्क्यांने वाढ झाली आहे. तर एनएसईतील मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.५७ व ०.९८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात २०१.६० अंशाने व निफ्टी बँक निर्देशांकात १६२.०५ अंशाने वाढ झाली आहे.
एनएसईतील क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक वाढ कनज्यूमर ड्युरेबल्स (२.४१%) समभागात झाली आहे.याशिवाय मेटल (१.०३%), पीएसयु बँक (०.५५%), तेल गॅस (०.३१%), ऑटो (१.५६%), मिडिया (०.५२%) या समभागात वाढ झाली आहे तर सर्वाधिक नुकसान आयटी (०.४३%) समभागात झाली आहे. याशिवाय फार्मा (०.१२%), हेल्थकेअर (०.२४ %) समभागात घसरण झाली आहे.
आज सकाळच्या सत्रात एम अँड एम, अल्ट्राटेक सिमेंट, जेएसडब्लू स्टील, टाटा मोटर्स, कोटक महिंद्रा,आयटीसी, एसबीआय, टाटा स्टील, भारती एअरटेल, एनटीपीसी, रिलायन्स, एचडीएफसी बँक, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, टायटन कंपनी या समभागात वाढ झाली आहे. तर नेस्ले, विप्रो, इन्फोसिस , एशियन पेंटस, एचयुएल, एचसीएलटेक, टीसीएस, सनफार्मा, लार्सन, आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व्ह, एक्सिस बँक, इंडसइंड बँक या समभागात घसरण झाली आहे.
एनएसईत आज एम अँड एम, ग्रासीम, अल्ट्राटेक सिमेंट, जेएसडब्लू स्टील, कोटक महिंद्रा, टाटा मोटर्स, एसबीआय, बीपीसीएल, टाटा स्टील, एनटीपीसी, भारती एअरटेल, रिलायन्स, अदानी एंटरप्राईज, कोल इंडिया, एचडीएफसी बँक, टेक महिंद्रा,पॉवर ग्रीड, श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स, एक्सिस बँक या समभागात वाढ झाली आहे. तर सिप्ला, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, डॉ रेड्डीज, अदानी पोर्टस, एशियन पेंटस, इन्फोसिस, हिरो मोटोकॉर्प, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट, एचसीएलटेक, लार्सन, आयशर मोटर्स, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व्ह, हिंदाल्को या समभागात घसरण झाली आहे.
आज सकाळी बाजारातील मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये वाढ झाल्याने तसेच लार्जकॅपमध्ये वाढ झाली असल्याने बाजारातील निर्देशांकात वाढ झाली आहे.