सर्वात पहिली सुपारी माझ्या नावाची मिळणं हा माझा विजय : सुषमा अंधारे

    13-May-2024
Total Views | 491
 
Sushma Andhare
 
मुंबई : तुम्हाला सर्वात पहिली माझ्या नावाची सुपारी मिळणं हा माझा विजय आहे, असे प्रत्युत्तर उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना दिले आहे. राज ठाकरेंनी आपल्या सभेत सुषमा अंधारेंचा जूना व्हिडीओ दाखवत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. यावर आता सुषमा अंधारेंनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
 
 
 
सुषमा अंधारे म्हणाल्या की, "मिस्टर राज तुमच्यात आणि माझ्यात एक फरक आहे. मी सामाजिक न्यायासाठी लढत आहे. पण तुम्ही माञ कायम प्रोएस्टॅब्लिश भूमिका घेत आला आहात. शिंदे-फडणवीस-अजित पवार या सगळ्यांनी मिळून दिलेल्या सुपारी मध्ये तुम्हाला पहिली सुपारी माझ्या नावाची मिळणे हा माझा विजय आहे."
 
हे वाचलंत का? -  "देशाची चावी योग्य हातात द्या अन्यथा..."; अण्णा हजारेंचं मतदारांना आवाहन
 
त्या पुढे म्हणाल्या की, "माझ्यात आणि वंदनीय बाळासाहेबांमध्ये एक साम्य नक्की आहे, बाळासाहेब म्हणतात, माझा शब्द म्हणजे बंदुकीची गोळी एकदा सुटली की, सुटली ती शोधत बसत नाही इथे पडली का तिथे पडली? २७ वर्षांपूर्वीचा वादविवाद स्पर्धेतील एक चंक काढून ज्यात माझा चेहराही ओळखायला येत नाही तो दाखवून फार मोठे तीर मारले असं जर वाटत असेल तर रमेश किनी हत्याकांड, कोहिनूर मिल, ईडीच्या नोटिसा, देवेंद्र फडणवीस यांनी मनसे ऊनसे म्हणत केलेली अवहेलना, अजित पवारांनी तुम्हाला गवत उपटण्यापर्यंतची केलेली सुसंस्कृत भाषा हे सगळं दाखवायला मला कितीसा वेळ लागेल? पण माझ्या माऱ्यापुढे सत्ताधारी किती हतबल झालेत? सत्ताधाऱ्यांच्या मनात माझी किती धास्ती आहे याची पोचपावती आज तुम्ही दिली. माझा हा धाक आणि दरारा सुपारीबाज लोकांवर कायम गारुड करून राहायला हवा," असे त्या म्हणाल्या.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121