तृणमूलकडून ईदसाठी लुंगी आणि नमाजी टोपीचे वाटप; निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल!

    06-Apr-2024
Total Views | 37
TMC distributing iftar items & Eid gifts

नवी दिल्ली
: लोकसभा निवडणुक २०२४ ची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर देशभरात निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये लोक तृणमूल काँग्रेसच्या बॅनरसमोर आणि ममता बॅनर्जींच्या फोटोसमोर लुंगी, नमाजी टोप्या आणि साड्यांचे वाटप करताना दिसत आहेत. भाजपच्या राज्य कमिटीने दि. ५ एप्रिल २०२४ रोजी निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार केली असून कारवाईची मागणी केली आहे.
 
 
 
व्हायरल होत असलेला व्हिडिओ ३४ सेकंदांचा आहे. पश्चिम बंगाल भाजपचे मीडिया सह-प्रभारी किया घोष यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. रघुनाथपूर हे बांकुरा लोकसभा मतदारसंघात येत असल्याचे त्यांनी या व्हिडिओचे वर्णन केले आहे. तृणमूल काँग्रेस ईदच्या सणामध्ये भेटवस्तूंचे वाटप करत असल्याचा आरोप किया घोष यांनी केला आहे. या भेटवस्तूंवर ममता आणि अभिषेक बॅनर्जी यांची छायाचित्रे छापण्यात आलेत. किया घोष म्हणाले की, या भेटवस्तू त्याच टीएमसी नेते अनुप चक्रवर्ती यांच्या मतदारसंघात वितरित केल्या जात आहेत, ज्यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की त्यांचा पक्ष पश्चिम बंगालमध्ये नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.




व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका टेबलावर पॉलिथिनमध्ये पॅक केलेले कपडे दिसतात, जे कॅरीबॅगमध्ये ठेवले जात आहेत. पाठीमागे तृणमूल काँग्रेसचे तर समोर ममता बॅनर्जीचे पोस्टर दिसत आहे. तसेच पिशवीत लुंगी (तहमाद), नमाजी टोपी, साड्या, लच्छा (ज्यापासून शेवया बनवल्या जातात) आणि सुका मेवा भरलेला आहे. . पिशव्यांवर ‘इफ्तार साहित्य, ईद गिफ्ट’ असे लिहिले आहे. याशिवाय ‘अल्पसंख्याक मोर्चा पुरुलिया जिल्हा’ असेही लिहिले आहे.


अग्रलेख
जरुर वाचा
ट्रम्प आणि मुनीर यांची भेट पाकिस्तानसाठी लज्जास्पद!; भारताचे पाकवर टीकास्त्र

"ट्रम्प आणि मुनीर यांची भेट पाकिस्तानसाठी लज्जास्पद!"; भारताचे पाकवर टीकास्त्र

(India on Trump-Munir meet) पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नुकतीच व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. या भेटीत डोनाल्ड ट्रम्प आणि असीम मुनीर यांच्यात महत्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. तसेच त्यांची ही भेट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, पाकिस्तानच्या पंतप्रधानांऐवजी लष्करप्रमुख ट्रम्प यांना भेटल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. असीम मुनीर आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीवर आता भारताने प्रतिक्रिया देत पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे...

ऑपरेशन सिंधू सुरुच! आतापर्यंत ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले, इराणमधून तिसरे विमान नवी दिल्लीत दाखल!

ऑपरेशन सिंधू सुरुच! आतापर्यंत ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले, इराणमधून तिसरे विमान नवी दिल्लीत दाखल!

(Iran-Israel War) इराण आणि इस्त्रायलमध्ये सशस्त्र संघर्ष सुरु झाल्यापासून इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही देशांतील संघर्ष तीव्र होत असल्याचे लक्षात घेता भारताने युद्धग्रस्त इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन सिंधू' (Operation Sindhu)राबवत नागरिकांच्या सुरक्षित परतीची जबाबदारी घेतली आहे. ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत इराणमधील ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121