परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रसंघास सुनावले; 'निष्पक्ष निवडणुकांविषयी...'
05-Apr-2024
Total Views | 41
नवी दिल्ली: स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक कशी घ्यावी, हे संयुक्त राष्ट्रसंघाने भारतास सांगू नये; अशा शब्दात परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी सुनावले आहे.संयुक्त राष्ट्र संघाच्या एका अधिकाऱ्याने गेल्या आठवड्यात पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना भारतीय निवडणुकांवर भाष्य केले होते. ज्यामध्ये प्रवक्त्याने म्हटले होते की भारतातील लोकांच्या राजकीय आणि नागरी हक्कांचे संरक्षण केले जाईल आणि प्रत्येकजण मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात मतदान करू शकेल, असे त्यांनी म्हटले आहे.
परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले की, आमच्या देशातील निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष व्हाव्यात हे संयुक्त राष्ट्रसंघाने सांगण्याची गरज नाही. भारतातील जनता आमच्यासोबत आहे आणि भारतातील लोक निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष आहेत याची जनताच खात्री करते. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने त्याची काळजी करण्या प्रश्नच नाही, असा टोलाही परराष्ट मंत्र्यांनी लगावला आहे.