हिंदू पक्षाचा मोठा विजय! एसएसआय सर्व्हेक्षणात भोजशाळेत सापडले गोमुख

    19-Apr-2024
Total Views |
 Bhojshala
 
भोपाळ : मध्य प्रदेशातील धार येथे असलेल्या भोजशाळेत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) कडून सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार एएसआयने येथे जीपीएस-जीआरएस आणि कार्बन डेटिंगसाठी उत्खनन करत आहे. त्याचा अहवाल दि. २९ एप्रिल २०२४ पर्यंत सादर केला जाऊ शकतो. गुरुवार, दि. १८ एप्रिल सर्वेक्षणाचा २८ वा दिवस आहे. आता असे म्हटले जाते की ४० टक्के काम करताना अनेक हिंदू कलाकृती सापडल्या आहेत.
 
एएसआयच्या सर्वेक्षण पथकात १५ अधिकारी आणि २५ कामगारांचा समावेश आहे. वास्तविक बुधवार, दि. १७ एप्रिल २०२४ भोजशाळेच्या आवाराबाहेरील गर्भगृहासमोरील हवन कुंडाजवळ सर्वेक्षणाचे काम सुरू होते. या पथकाने अकाल कुईया आणि दर्ग्याजवळ सर्वेक्षणही केले. गर्भगृहासमोर अनेक दगड, भिंत चित्रे आणि पुतळे सापडल्याचे साक्षीदारांनी म्हटले आहे.
 
 
मिळालेल्या वृत्तानुसार, येथील सर्वेक्षणात अनेक हिंदू चिन्हे आढळून आल्याचे हिंदू पक्षाने म्हटले आहे. भोजशाळा हे मंदिर असल्याचा त्यांचा दावा आहे. ते म्हणतात की, सर्व्हेक्षणाच्या १५ व्या दिवशी गर्भगृहाच्या मागील भागात तीन पायऱ्या दिसल्या, तर १९ व्या दिवशी भिंतीवर कोरण्यात आलेल्या गायीची प्रतिकृती सापडली. हिंदू पक्षाचा दावा आहे की कोणत्याही मंदिरात अभिषेक करण्यासाठी फक्त गाईच्या मुखातून पाणी घेतले जाते.
 
इतकेच नाही तर हिंदू पक्षाने असाही दावा केला आहे की त्याच्या पश्चिम भागात एक भिंत आणि खांबासारखी रचना सापडली आहे, ज्याचा पाया एक हजार वर्षे जुना आहे. येथे मधोमध एक तलाव आहे, त्याची साफसफाई करताना अनेक अवशेष समोर आल्याचा दावा केला जात आहे. मंदिराच्या मध्यभागी ही यज्ञशाळा असल्याचा हिंदू बाजूचा दावा आहे. सनातनचे केंद्र असल्यामुळे येथे शिलालेख व पुतळे सापडले आहेत.
 
 
हिंदू पक्षाच्या याचिकाकर्त्यांनी दावा केला आहे की, गर्भगृह, भोजशाळेच्या उत्तर आणि दक्षिण दिशेचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. असे काही अवशेष येथे सापडले आहेत, जे भोजशाळेवरील हल्ल्याची कथा सांगतात. येथे असे अवशेष सापडले असून, हा तपासाचा विषय असल्याचे त्यांनी सांगितले. तपासात सत्य बाहेर येईल आणि ही भोजशाळा असल्याचे सिद्ध होईल.
 
दरम्यान, आजच्या सर्वेक्षणात काहीही निष्पन्न झाले नसल्याचे मुस्लिम पक्षाचे अब्दुल समद यांचे म्हणणे आहे. दोन दिवसांपूर्वी भोजशाळेमध्ये भगवान गौतम बुद्धांची मूर्ती सापडल्याचा दावा त्यांनी केला. धार येथील भोजशाळा ही एएसआयद्वारे संरक्षित इमारत आहे. २०२२ मध्ये हिंदू संघटनांनी जीपीआर आणि जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करून भोजशाळेचे सर्वेक्षण करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. इंदूर उच्च न्यायालयाने ते मान्य करत दि. ११ मार्च रोजी सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. स्मारकाच्या मूळ स्वरुपात कोणताही बदल करू नये, असेही सांगण्यात आले. त्यानंतर दि. २२ मार्चपासून सर्वेक्षण सुरू करण्यात आले.