एसआयपी गुंतवणूकीत नवा उच्चांक!
एसआयपीत आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये १९२७१ कोटींची गुंतवणूक
11-Apr-2024
Total Views | 135

मुंबई: एसआयपी (Systematical Investment Plan) गुंतवणूकीत गेल्या आठ वर्षांत सहावेळा वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या १० महिन्यात स्मॉलकॅप निधीत ९४ कोटींचा निधी बाहेर गेला आहे तर लार्जकॅप कंपनीतील २१२७ कोटींचा निधी बाहेरून गुंतवणूकीत आला. बदललेल्या परिस्थितीत इक्विटी गुंतवणूकीत गुंतवणूकदारांनी दिशा बदललेली आहे. तरीदेखील यावेळी इक्विटी गुंतवणूकीत येणारा पैसा कमी होऊन २६७०३ कोटींच्या तुलनेत २२६९१ कोटींवर आला आहे.
अर्थव्यवस्थेत झालेला बदल व गुंतवणूकीत पुनर्रचना पाहता हा बदल झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.असोसिएशन ऑफ म्युचल फंड (AMFI) ने सांगितलेल्या माहितीनुसार, एसआयपीत मागील आर्थिक वर्षातील १९१८७ कोटीवरून १९२७१ कोटींवर गुंतवणूक वाढ झाली आहे. यापूर्वी इक्विटी गुंतवणूकीत स्मॉलकॅप व मिडकॅप गुंतवणूकीत लोकांचा कल वाढला होता. परंतु या महिन्यात या ट्रेंडमध्ये बदल होत स्मॉलकॅपकडे वळले आहेत.
तरीदेखील तज्ञांच्या मते गुंतवणूकदारांना गुंतवणूकीत समतोल राखण्याचा सल्ला देत आहेत. मार्चमध्ये एकूण मालमत्तेत गुंतवणूक (Asset Under Management) मार्चमध्ये ५३.४ लाख कोटी होती. फेब्रुवारीतील ५४.५४ लाख कोटींच्या तुलनेत ही घट झाली आहे. गुंतवणूकीत झालेला बदल हे यातील उदाहरण असल्याचे मार्केट अभ्यासकांनी सांगितले आहे.
गुंतवणूकीत बदल झालेला असूनही गुंतवणूकीत झालेली मोठी वाढ मार्चमध्ये नोंदवण्यात आली आहे. एप्रिल २०१६ मधील ३१२२ कोटींच्या तुलनेत मार्च २०२४ मध्ये १९२०० कोटींची गुंतवणूक एसआयपीत झाली आहे. बाजारात गुंतवणूकीत बदल होऊनही भारतीय बाजारात वाढलेला गुंतवणूकदारांचा विश्वास व सकारात्मकतेत वाढ झाल्याने या गुंतवणूकीत वाढ झाली आहे.