मोठी बातमी: फ्री ट्रेड अँग्रीमेंट सदस्यीय देशातील आयात करात भारत कपात करणार

फ्री ट्रेड अँग्रीमेंट (FTA) अंतर्गत कर कपातीचा निर्णय

    09-Mar-2024
Total Views | 53

FTA
 
 India- Eurpope Free Trade Agreement Latest 
 
मुंबई: आज भारत युरोपशी फ्री ट्रेड अँग्रीमेंट(FTA) बद्दल मोठा निर्णय घेण्याची चिन्हे वर्तवली जात आहेत. प्रसारमाध्यमांनी तसे वृत्त देत आयात निर्यात व्यापारातील ड्युटी (कर) या देशांतर्गत कर कमी करण्यासाठी यासंबंधी निर्णय आजच्या बैठकीत घेतला जाऊ शकतो. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार,सदस्य देशातील स्वित्झर्लंड,नॉर्वे,आइसलँड,लिकटेंस्टाइन या देशांशी हा करार होत भारतातील त्यांच्या व्यापारावर आयात कर कपात केली जाण्याची शक्यता आहे कारण भारतातील हे गुंतवणूकदार देश असल्याने त्यांच्याशी सलोखा वाढवला जाऊ शकतो. हे तिन्ही देश युरोपियन फ्री ट्रेड अँग्रीमेंट (EFTA) चे सदस्य असल्याने भारत या देशांशी मैत्रीचा हात पुढे करणार आहे.
 
या ट्रेड अँग्रीमेंट बरोबरच या देशांकडून १५ वर्षासाठी १०० बिलियन डॉलरची गुंतवणूक होऊ शकते. गुरूवारच्या कॅबिनेट बैठकीत याला मान्यता मिळाल्याने रविवारी हा करार होणे अपेक्षित आहे.स्वित्झर्लंडसारख्या देशांनी इंडस्ट्रियल गुड्स वरील आयात दर कपात केली तरी शेतकी उत्पादनावर आयात दर कायम ठेवले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात या दरकपातीचा परिणाम घड्याळ, चॉकलेट,मशिनरी, वाईन या उत्पादनावर होऊ शकतो.
 
भारताकडून संबंधित देशाशी इंटलेकचुयल प्रोपर्टी राईट्स (Intellectual Property Rights) यांमध्ये विशेष चर्चा होण्याची शक्यता आहे.सरकार यातील काही मुद्यांवर ठाम असून अडलेल्या मुद्यांवर राहिलेली चर्चा सुरू होऊ शकते.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121