माढ्याचा तिढा सुटणार? पवारांतर्फे जानकरांना बळ देण्याचा प्रयत्न

    06-Mar-2024
Total Views | 58

Sharad Pawar & Mahadev Jankar


मुंबई :
माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा लवकरच सुटणार असल्याची माहिती पुढे येत आहे. काही दिवसांपुर्वीच शरद पवार यांनी महादेव जानकार सोबत आल्यास त्यांना माढ्याची जागा देऊ असे वक्तव्यं केले होते. त्यानंतर आता याबाबत निर्णय झाल्याचे सांगण्यात येत आहे.
 
सुत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना माढ्याची लोकसभेची जागा मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शरद पवार आणि महादेव जानकर यांच्यात याबाबत चर्चा झाली असून लवकरच निर्णय होणार असल्याचेही बोलले जात आहे.
शरद पवार माढा लोकसभेची जागा जानकरांना सोडणार असल्याची माहिती पुढे येत आहे. महादेव जानकर हे महायुती सरकारमध्ये पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास विभागाचे माजी मंत्री राहिलेले आहेत. त्यानंतर आता शरद पवारांतर्फे जानकरांना बळ देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
दुसरीकडे, महाविकास आघाडीची जागावाटपासंदर्भात बैठक पार पडली असून या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरदेखील सहभागी झाले होते. दरम्यान, या बैठकीत काय ठरलं याबाबत अजून स्पष्टता नसली तरी उबाठा गटाला २३, काँग्रेसला १५ आणि शरद पवार गटाला १० जागा मिळणार असल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121