मोदींचे विकासाचे नवे मिशन दक्षिण? तेलंगणात हजारो कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन

५६००० कोटींच्या विकासकामाचे पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते उद्घाटन

    04-Mar-2024
Total Views | 32

PM Modi
 
 
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाकामांचे उद्घाटन करत आपल्या ' मिशन दक्षिण ' ची प्रचिती दिली आहे. लोकसभा निवडणूकपूर्वी दक्षिणेकडील राज्यातील विकासकामांचा धडाकाच लावला आहे. तेलगंणातील अदिलाबाद येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५६००० कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन केले आहे.
 
 
या प्रकल्पांचा शिलान्यास करताना पंतप्रधान म्हणाले, ' आदिलाबाद मधील हे विकासकाम केवळ तेलगंणामधील नाही तर देशातील होणाऱ्या विकासाची साक्ष आहे. ३० हून अधिक ५६००० हजार कोटींचे प्रकल्प लोकाभिमुख कामासाठी तयार होत आहेत. सरकार व तेलंगणा राज्याला १० वर्ष पूर्ण झाली आहेत याशिवाय सरकारकडून तेलंगणा राज्याला आवश्यक ते सर्व सहकार्य करू ' अशी ग्वाही मोदींनी यावेळी दिली आहे.
 
 
८०० मेगावॉटचा उर्जा प्रकल्प तेलंगणामध्ये होत आहे. या प्रकल्पाविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले, 'या प्रकल्पामुळे तेलंगणा येथे ऊर्जा निर्मितीची क्षमता वाढणार आहे. अंबारी,आदिलाबाद, पिंपतखुटी रेल्वे लाईनचे विद्युतीकरण व इतर दोन महामार्ग प्रकल्पाचे उद्घाटन करताना पंतप्रधान मोदी बोलत होते. 'सगळ्या राज्याचा विकास हा देशाचा विकास असल्याचे उद्गार त्यांनी यावेळी काढले आहेत.
 
 
गुंतवणूकीविषयी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ' भारताची अर्थव्यवस्था तेजीने वाढत आहे. राज्य व केंद्र पातळीवरील अर्थव्यवस्था वाढीस लागली असून यामुळे तेलंगणा राज्य प्रगती करत आहे. '
 
 
पंतप्रधानांनी उद्घाटन केलेले प्रकल्प पुढीलप्रमाणे आहेत -
 
 
१) एनटीपीसी ८०० मेगावॉटचा प्रकल्प दुसरा - थर्मल पॉवर प्रकल्प पेडापल्ली प्रकल्प
 
२) ६०० मेगावॉटचा युनिट २ उत्तर करनपुरा सुपर थर्मल पॉवर चत्रा झारखंड
 
३) लाईट वेट एग्रिगेट प्रकल्प सीपत बिलासपूर छत्तीसगड
 
४) एसटीपी वॉटर टू ग्रीन हायड्रोजन प्रकल्प ग्रेटर नोएडा
 
५) सिंग्राऊली सुपर थर्मल पॉवर प्रकल्प - स्टेज २
 
६) फ्लू गॅस सीओटू इथेनॉल प्रकल्प
 
७) सी वॉटर टू ग्रीन हायड्रोजन प्रकल्प सिमंहाद्री विशाखापट्टणम
 
८) तीन सोलार प्रकल्प सतलूज झलक विद्युत निगम - जलायून व कानपूर
 
 
९) सात पॉवर ग्रीड प्रकल्प व एका प्रकल्पाचा पॉवर ग्रीड प्रकल्प कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121