मुंबई:आंतरराष्ट्रीय पातळीवर मतभिन्नता, ओपेक (OPEC) देशांनी कच्च्या तेलाच्या उत्पादनात केलेली घट व जगभर उत्पादनांच्या तुलनेने वाढलेली मागणी पाहता क्रूड (कच्च्या) तेलाच्या भावात आज चांगली वाढ झाली आहे. क्रूड तेलाच्या WTI निर्देशांकात (वेस्ट टेक्सास निर्देशांकात) आज ०.८८ टक्क्याने वाढ झाली असून क्रूड तेल निर्देशांक ८१.३४ युएस डॉलरपर्यंत पोहोचला आहे.
तसेच ब्रेंट क्रुड निर्देशांकातही वाढ ०.६१ टक्क्याने वाढ कायम होऊन क्रूड निर्देशांक ८५.३५ पातळीवर पोहोचला आहे.OPEC सदस्य देशांनी मार्च २०२४ ते जून २४ या काळात उत्पादनात कपात करण्याचे ठरवले आहे.
तेलाच्या भविष्यातील मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने याहून अधिक क्रूड तेलाच्या भावात वाढ होऊ शकते असे तज्ञांचे मत आहे. रशिया युक्रेन युद्ध, रेड सी घटना या घटनांचा मुख्यतः परिणाम बाजारपेठेत पडला आहे.अखेरीस एमसीएक्स (Multi Commodity Exchange) निर्देशांकात ०.०४ टक्क्याने वाढ होत प्रति बॅरेल किंमत ६७४९ रूपये किंमत पोहोचली आहे.
आयसीआयसीआय बँके ग्लोबल मार्केटने केलेल्या भाकीतानुसार देखील तेलाच्या मागणीत आर्थिक वर्ष २४-२५ मध्ये प्रति बॅरेल मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मध्यपूर्वेतील आणि रशिया आणि युक्रेनमधील वाढत्या संघर्षांमुळे निर्माण झालेल्या कडक जागतिक पुरवठ्याच्या चिंतेमुळे सोमवारी आशियाई व्यापारात तेलाच्या किमती वाढल्या, तर यूएस रिग संख्या कमी झाल्यामुळे वरच्या किमतीच्या दबावात वाढ झाली.