Stock Market Update:
मुंबई: इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज मोठी वाढ झाली आहे. सकाळच्या सत्रात बीएससी (BSE),एनएएसी (NSE) बाजारात आज सेन्सेक्स निफ्टी मध्ये चांगली वाढ झाली आहे.सकाळी ११.४० पर्यंत एस अँड पी सेन्सेक्स निर्देशांकात २२८ अंशाने वाढत होत सेन्सेक्स ७२८७६.८७ पर्यंत पोहोचला आहे तर निफ्टी ५० मध्ये ६९.१५ अंशाने वाढत २२०८१.१० पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात २४८.७६ पातळीने वाढ होत ५३२०२.२१ पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी बँक निर्देशांक २६६.१५ अंशाने वाढत ४६९११.०५ पातळीवर पोहोचला आहे.
काल फेडरल रिझर्व्ह बँकेच्या व्याजदरात कुठलीही कपात न होता दर स्थिर राहिल्याने गुंतवणूकदारांच्या भावना सकारात्मक दिसल्या आहेत. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवरील बाजाराबरोबरच आशियाई व भारतीय बाजारात जाणवला.आज सकाळी एनएससी वर बजाज ऑटो,हिरो मोटोकॉर्प, सनफार्मा, अपोलो हॉस्पिटल या समभागात (शेअर) मध्ये वाढ झाली असून एचसीएलटेक, विप्रो, इन्फी, एलटीआयएम , टीसीएस या समभागात नुकसान झाले आहे.
बीएससीवर सनफार्मा, मारूती सुझुकी,टाटा स्टील,टायटन कंपनी,आयटीसी, लार्सन, एचयुएल,भारती एअरटेल या समभागात फायदा झाला असून एचसीएलटेक,विप्रो, इन्फोसिस, टीसीएस,टेक महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, नेसले या समभागात नुकसान झाले आहे.
क्रॉम्प्टन ग्रीव्हज कनज्यूमर इलेक्ट्रोनिक कंपनीला आयकर विभागाने ६८ कोटी रुपये कर भरण्यासाठी नोटीस पाठवली होती. आज सकाळी समभाग थोड्या अंशाने वाढत २६९.९० रूपये प्रति समभागावर पोहोचला आहे. निफ्टी ५० मधील समभाग ०.३२ टक्क्याने वाढले.निफ्टी बँक ०.५० टक्क्याने तर बीएससी स्मॉलकॅप, मिडकॅप १.४ व ०.१९ टक्क्याने वाढले आहेत.
अदानी पोर्टस १.२७ टक्क्याने तर बजाज ऑटो २.७८ टक्क्याने वाढला तर एचसीएलटेक समभागात २.३२ टक्क्याने घसरण झाली होती. माझगाव डॉक समभागात ३ टक्क्याने वाढ होत सकाळी १९४८ रुपये प्रति समभागपर्यंत वाढ झाली होती.माझगाव डॉकला मुंबई पोर्ट अथोरीटीकडून जागा व इमारतीची उपलब्धता करण्यात आली होती.
काल गुंतवणूकदारांना ५.७२ लाख कोटीचा फायदा
बेंचमार्क निर्देशांकात काल मोठी उसळण झाल्याने गुंतवणूकदारांना त्याचा मोठा फायदा झाला आहे. बीएससी सेन्सेक्स ५४० व निफ्टी ७८०.७७ अंशाने वाढल्यामुळे ग्लोबल निर्देशांकात मोठी वाढ झाली परिणामी गुंतवणूकदारांनी १ टक्क्यांनी अधिक प्रिमियम कमावला असल्याचे प्रसारमाध्यमांनी सांगितले आहे. बीएससीचे बाजारी भांडवल (मार्केट कॅपिटलायझेशन) ५७२७५२.७९ कोटी व एनएससीचे बाजारी भांडवल ३७९८५६६९.१२ कोटी रुपये इतके होते.