मुंबई: इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज वाढ झाली आहे. निफ्टी सेन्सेक्सने आज बाजारात परतीचे संकेत दिले असून दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर सेन्सेक्स निर्देशांकात ८९.६४ अंकाने वाढ होत अखेरच्या सत्रात सेन्सेक्स ७२१०१.६९ पातळीवर स्थिरावला आहे. तर निफ्टी ५० निर्देशांक २१.६५ अंशाने वाढत २१८३९.१० पातळीवर पोहोचला आहे. तीन दिवसानंतरही सेन्सेक्स बँक निर्देशांकात घट कायम असून ४७.५४ अंशाने घट झाली. पर्यायाने सेन्सेक्स निफ्टीची पातळी ५२५९५.६५ पातळीवर पोहोचली.
बँक निफ्टीमधील घसरणीवर मुंबई तरूण भारतला प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे सिनियर टेक्निकल एनालिस्ट रुपक डे म्हणाले, "बँक निफ्टीला अस्थिरतेच्या दुसऱ्या फेरीचा सामना करावा लागला, विशेषत: यूएस फेडच्या बैठकीपूर्वी, बैल आणि अस्वल यांच्यातील संघर्ष कायम होता. मुख्य समर्थन ४६०००-४५८०० झोनमध्ये आहे,आणि शेवटच्या आधारावर ही पातळी कायम राखणे हे सतत तेजी दर्शवते. स्थिती. तात्काळ प्रतिकार ४७००० वर स्थित आहे, 20DMA बरोबरच, आणि या पातळीच्या वरचा निर्णायक बंद ४८००० -४८५०० च्या आसपासच्या पातळीला लक्ष्य करत, वरचा कल पुन्हा प्रज्वलित करू शकतो."
निफ्टीमधील पातळीवर भाष्य करताना मुंबई तरूण भारतला एलकेपी सिक्युरिटीजचे सिनियर टेक्निकल एनालिस्ट रुपक डे म्हणाले, ' "फेडच्या धोरणाच्या बैठकीपूर्वी निर्देशांक अस्थिर राहिला. एकूणच भावना नकारात्मक राहिली कारण निर्देशांक मागील एकत्रीकरणाच्या कमी खाली बंद झाला. याव्यतिरिक्त, निर्देशांकाने सत्राचा शेवट गंभीर मूव्हिंग सरासरीच्या खाली केला. तथापि,अलीकडील खाली आणखी घसरण अपेक्षित आहे. २१७०० च्या आसपास स्थित असलेल्या तासाच्या चार्टवर कमी स्विंग करा. उच्च टोकावर, प्रतिकार २१९०० -२२००० वर ठेवलेला आहे."
निफ्टी बँक निर्देशांकातही ७३.९० अंशांच्या मोठ्या फरकाने घट झाली असल्याने बँक निफ्टी अखेरच्या सत्रात ४६३१०.९० पातळीवर स्थिरावला आहे. बीएससीवर (BSE) वर बँक निर्देशांक वगळता बाकी सगळ्या निर्देशांकात चांगली वाढ झाली आहे. बीएससी मिडकॅप १८.८६ अंशाने वाढत ३७७६२.१३ पातळीवर पोहोचले मात्र फंड स्ट्रेस टेस्टचा परिणाम आजही कायम राहत एस अँड पी स्मॉलकॅपमध्ये ०.१४ टक्क्याने म्हणजेच ५८.६३ अंशाने घट झाली आहे. त्यामुळे लार्जकॅप समभागातील वाढलेल्या मुल्यांकनाने मार्केट थोड्या फरकाने वधारले आहे.
एनएससीवरील स्मॉलकॅपमध्ये ०.०१ टक्क्याने वाढ झाली आहे. मात्र निफ्टी मिडकॅप मात्र ०.०५ टक्क्याने घसरण झाली आहे. एकूणच अखेरच्या सत्रापर्यंत स्मॉलकॅप समभागात ८ टक्क्यानी घसरण झाली आहे. त्यामुळे छोट्या कंपनीच्या समभागात गुंतवणूकदारांना नुकसान झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
निफ्टी सेक्टोरल इंडायसेस( क्षेत्रातील निर्देशांकात)आज संमिश्र प्रतिसाद बघायला मिळत आहे. निफ्टीवर सर्वाधिक वाढ तेल व गॅस समभागात (शेअर्स) वर झाला आहे.तेल गॅस निर्देशांक १.२९ टक्क्याने वाढ झाल्याने गुंतवणूकदारांना यांचा लाभ झाला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रुडवरील किंमती घटल्याने त्याचा फायदा तेल व गॅस समभागात झालेला दिसला आहे.
या खालोखाल रियल्टी (०.६२ %) निफ्टी एफएमसीजी (०.४८%) , निफ्टी पीएसयु बँक (०.०५%) हेल्थकेअर (०.१९ %) या निर्देशांकात वाढ होऊन उर्वरित आयटी, मिडिया, मेटल, फार्मा, खाजगी बँका, फायनाशियल सर्विसेस, कनज्यूमर ड्युरेबल्स या क्षेत्रीय निर्देशांकात घसरण झाली. गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान मेटल समभागावर झाले असून त्याखालोखाल नुकसान हे फार्मा, खाजगी बँका,आयटी या समभागावर झाला आहे.
दिवसभरात सर्वाधिक सेन्सेक्सची पातळी ७२४०२.६७ असून निफ्टीवर समभागांची सर्वाधिक पातळी २१९३०.९० वर पोहोचली होती. अधिकृत संकेतस्थळानुसार आज एनएससीवरील कंपन्यांचे एकूण बाजारी भांडवल (मार्केट कॅपिटलायझेशन) ३७१.०८ लाख कोटी होते तर बीएससीवरील कंपन्यांचे बाजारी भांडवल ३७३.९२ लाख कोटी रुपये इतके राहिले आहे.
युएस डॉलरच्या तुलनेत भारतीय रूपयाची किंमत घसरत अखेरीस ८३.१७ वर स्थिरावली होती. तेल कंपन्यांकडून डॉलरची मागणी वाढल्याने रूपयाचे मूल्यांकन ०.१५ अंशाने घसरले गेले आहे.संध्याकाळपर्यंत क्रुड तेलाच्या WTI ( वेस्ट टेक्सास निर्देशांकात) ०.७६ अंशाने ( ०.९१ टक्क्याने) घसरण झाली व एमसीएक्सवरील तेलाच्या निर्देशांकात ६३.०० अंशाने संध्याकाळपर्यंत घसरण होत प्रति बॅरेल किंमत ६८२५ रूपयावर पोहोचली. ब्रेंट तेल निर्देशांकात ०.८५ टक्के म्हणजेच ०.७७ अंशाने घसरण झाली आहे. क्रूडची मागणी बाजारात कमी झाल्याने तेलाच्या किमंतीत आंतरराष्ट्रीय पातळीवर घट झाली आहे.
देश पातळीवर सोन्याच्या किंमतीत फारसा फरक पडलेला नाही. घसरलेला रूपया वाढलेले डॉलर मूल्य असूनही दोन दिवसांपूर्वी भारताच्या विदेशी मुद्रात (Forex Reserves) वाढ झाली होती. मुंबईत सोनाच्या भावात ' जैसे थे' परिस्थिती कायम होती.२२ कॅरेट प्रकारच्या सोन्याची प्रति ग्रॅम किंमत ६०८० रूपये व २४ कॅरेट सोन्याची प्रति ग्रॅम किंमत ६६३३ रुपये इतकी होती.
बीएससीवर सर्वाधिक फायदा मारूती, पॉवर ग्रीड, नेसले इंडिया, आयटीसी, रिलायन्स, कोटक बँक, टेक एम, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, सनफार्मा, टायटन, बजाज फिनसर्व्ह, एशियन पेटंस,एनटीपीसी, एम अँड एम,आयसीआयसीआय बँक या समभागावर झाला असून सर्वाधिक नुकसान टीसीएस, विप्रो, इन्फी, एचसीएलटेक, जेएसडब्लू, हिंदुस्तान युनिलिव्हर, एक्सिस बँक, टाटा मोटर्स, टाटा स्टील या समभागात सर्वाधिक नुकसान झाले आहे.
एनएससीवर आयशर मोटर्स, मारुती, नेसले इंडिया, पॉवर ग्रीड, ओएनजीसी, बीपीसीएल, आयटीसी, रिलायन्स, अपोलो हॉस्पिटल, टेक महिंद्रा, कोटक महिंद्रा या समभागात झाला असून सर्वाधिक नुकसान टाटा स्टील, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट, एक्सिस बँक, सिप्ला, युपीएल, एचयुएल, एचडीएफसी, हिरो मोटोकॉर्प, इन्फोसिस विप्रो, डॉ रेड्डीज या समभागात सर्वाधिक नुकसान गुंतवणूकदारांना सहन करावे लागले आहे.
निफ्टीवर २६४८ समभागापैकी १०६ समभाग अप्पर सर्किटवर पोहोचून १०४ समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत. २० कंपन्यांचे समभाग ५२ आठवड्यातील सर्वाधिक पातळीवर पोहोचले तर ५९ कंपन्यांच्या समभागात आज ५२ आठवड्यातील सर्वाधिक नुकसान झाले आहे. ११८२ समभागांचे मूल्यांकन बाजारात वाढले असून १३५६ समभागांचे मूल्यांकन घसरले आहे.
एनएससीवरील एकूण २७ कंपन्यांचे समभाग वाढले असून २३ कंपन्यांचे समभाग गुंतवणूकदारांनी नाकारले आहेत.
युएस ट्रेजरी यील्डमध्ये (Yield) मध्ये दोन दिवसांत फेडरल रिझर्व्ह व्याज दरा संदर्भात बैठक होण्याची शक्यता वर्तवली गेल्याने कमी झाले होते. परदेशी गुंतवणूकदारांनी (Foreign Institutional Investors) ने १४२१.४८ कोटींची गुंतवणूक केली होती. मंगळवारी भारताच्या डायरेक्ट टॅक्समध्येही आज १९.८८ टक्क्याने वाढ झाली आहे.
आजच्या बाजारातील परिस्थितीविषयी मुंबई तरूण भारतशी बोलताना बोनझा पोर्टफोलिओ लिमिटेडचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले,' दिवसाचा निफ्टी ०.१० % ने २१८३९ वर सकारात्मक नोटवर बंद झाला तर सेन्सेक्स ०.१२ % ने ७२१०१ वर बंद झाला. निफ्टी ऑइल अँड गॅस आणि निफ्टी एनर्जी अनुक्रमे १.२९ % आणि १.०७ % ने वाढीव क्षेत्रामध्ये होते. भारतीय बाजारांसह जागतिक स्तरावर बोलायचे तर, यूएस बाँडवरील उत्पन्न वाढल्यामुळे इक्विटी मार्केट्स सुधारतात.
यूएस बाँड उत्पन्न वक्र सध्या त्याच्या शीर्षस्थानी आहे; जर तो ऑक्टोबर २०२२ च्या उच्चांकाच्या वर पुन्हा एकदा ब्रेक झाला तर देशांतर्गत बाजारात सुधारणा होण्याची शक्यता अपेक्षित आहे. सध्या स्थानिक बाजारपेठेत शांतता अनुभवणारे विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPIs) सध्याची मंदी कायम राहिल्यास निधी काढण्यासाठी अधिक आक्रमक होऊ शकतात.बुधवारी झालेल्या बैठकीत, यूएस फेडरल रिझर्व्हच्या फेडरल ओपन मार्केट कमिटी (एफओएमसी) दर कमी करण्याची घोषणा करण्याची शक्यता नाही. शिवाय, यूएस फेड लवकरच व्याजदर कमी करेल अशी शक्यता झपाट्याने कमी होत आहे जी बाजारातील निराशावादाला समर्थन देत आहे, कारण यूएस चलनवाढीचा दर सध्या ३.१५ % आहे तो २ % कम्फर्ट झोनपेक्षा खूप जास्त आहे. आयशर मोटर्स, मारुती सुझुकी, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, नेस्ले इंडिया आणि ओएनजीसी हे निफ्टी वाढवणाऱ्यांमध्ये होते; टाटा स्टील, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स, टाटा मोटर्स, ॲक्सिस बँक आणि सिप्ला यांचे समभाग घसरले.'
आजच्या शेअर बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना मुंबई तरूण भारतला रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडचे एसव्हीपी अजित मिश्रा म्हणाले, 'मंगळवारच्या घसरणीनंतर मोकळा श्वास घेत बाजाराने अस्थिर व्यवहार केले आणि जवळजवळ अपरिवर्तित संपले. सुरुवातीच्या वाढीनंतर, काही वेळातच पुन्हा घसरण सुरू झाली तथापि निवडक हेवीवेट्समधील पुनर्प्राप्तीमुळे सत्र पुढे जात असताना तोटा कमी झाला.क्षेत्रीय आघाडीवर, संमिश्र कल कायम राहिला ज्यामध्ये ऊर्जा, एफएमसीजी आणि रियल्टी उच्च तर मेटल आणि वित्तीय लाल रंगात संपले.
नुकत्याच झालेल्या घसरणीनंतर आपल्याला श्वास घेता येईल पण टोन नकारात्मक राहण्याची शक्यता आहे. जोपर्यंत निफ्टी २२१००० ची पातळी निर्णायकपणे परत मिळवत नाही तोपर्यंत सहभागींनी “वाढीवर विक्री” हा दृष्टिकोन सुरू ठेवावा. तसेच, आम्ही इतरांपेक्षा इंडेक्स मेजरसाठी आमच्या प्राधान्याचा पुनरुत्तर करतो आणि तोटा करण्याच्या पोझिशनमध्ये भर घालणे टाळतो.'
मार्केटवर प्रतिक्रिया देताना जीओजीत फायनान्सशियल सर्विसेसचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले,"अनुकूल जागतिक भावना आणि ठोस प्रत्यक्ष कर संकलनामुळे उचलले गेले, भारतीय बाजार पुन्हा उफाळून आले, माफक नफ्यासह बंद झाले. मजबूत FII आणि DII प्रवाहाने बाजार टिकवून ठेवला. बाजारातील ताज्या सहमतीनुसार, जूनमध्ये दर कपातीची शक्यता कमी झाली आहे. यूएस फेड लवचिक अर्थव्यवस्थेमुळे वर्षाच्या उत्तरार्धात कपातीचा दर विलंब होण्याची शक्यता आहे. स्थानिक मध्यम आणि लहान कॅप्स प्रीमियम मूल्यांकनांद्वारे चालविल्या जाणाऱ्या मोठ्या कॅप्सपेक्षा कमी कालावधीत मागे पडण्याची शक्यता आहे."