“चक्क श्री कृष्णालासुद्धा…”, बॉलिवूडमधील वर्णभेदावर दिव्येंदू भट्टाचार्यांचे ते वक्तव्य चर्चेत

    02-Mar-2024
Total Views | 93
अभिनेते दिव्येंदू भट्टाचार्य यांनी एका मुलाखतीत हिंदी चित्रपटसृष्टीत वर्णभेद वाढत चालला आहे असी खंत व्यक्त केली. तसेच, ५०० कोटींचा चित्रपट कधी ऑफर केला नाही असे म्हणत त्याची अपेक्षा देखील नसल्याचे म्हटले.
 

dibyendu bhattacharya 
 
मुंबई : “हिंदी चित्रपटसृष्टीत वर्णभेद फार वाढत चालला आहे”, असे वक्तव्य अभिनेते दिव्येंदू भट्टाचार्य (dibyendu bhattacharya) यांनी केले. अभिनेत्री आलिया भट्ट हिची निर्मिती असलेल्या ‘पोचर’ (Pocher) या वेब सीरीजमध्ये दिव्येंदू एका महत्वपुर्ण भूमिकेत दिसले आहेत. आजवर त्यांनी हिंदी, बंगाली चित्रपटसृष्टीतल छोटेखानी पण प्रभावशाली भूमिका केल्या आहेत. एका मुलाखतीत त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील वर्णभेदावर भाष्य केले असून जे रंगाने फारसे गोरे नाहीत, ज्यांचा रंग सावळा किंवा थोडा डार्क आहे अशा कलाकारांना इंडस्ट्रीमध्ये (Bollywood) चांगल्या भूमिका मिळत नाही असा खुलासा देखील त्यांनी केला आहे.
 
 
दिव्येंदू भट्टाचार्य म्हणाले की, “माझ्याकडे ज्या प्रकारचं काम येतं ते मी करतो. ५०० कोटींच्या चित्रपटात झळकायला हवं अशी माझी कधीच अपेक्षा नसते. किंबहुना मला तसे बिग बजेट चित्रपट माझ्यापर्यंत येतच नाहीत. पण माझ्याकडे जे काम येतं ते मी अत्यंत काळजीपूर्वक आणि प्रामाणिकपणे करतो.” पुढे ते वर्णभेदाबद्दल बोलताना म्हणाले की, “हॉलिवूडमध्ये सर्व वर्णाच्या कलाकरांना चित्रपटात घेणे बंधनकारक असते. भारतात मात्र हे प्रमाण वाढताना दिसत आहे, अशी खंत व्यक्त करत दिव्येंदू यांनी बॉलिवूड आमि हॉलिवूडची तुलना देखील केली.
 
 
दिव्येंदू भट्टाचार्य पुढे म्हणाले, “मला असं वाटतं की भारतीय अधिकच वर्णभेद करायला लागले आहेत. भारताबाहेर होणारा वर्णभेद हा फार भयानक आहे त्यांना आपल्या वर्णाची लाज वाटते ही एक जागतिक समस्या आहे.” एका मालिकेचे उदाहरण देत ते म्हणाले की, “मी टेलिव्हिजनवर श्री कृष्ण यांच्यावर बेतलेला एक शो बघत होतो. ज्यात उजळ त्वचेच्या व्यक्तीला कृष्ण म्हणून घेण्यात आले होते, तेव्हा मला हे समजलं की चक्क कृष्णालाही ही लोकं गोरा दाखवू शकतात, हे फक्त भारतीयच करू शकतात.” आत्तापर्यंत दिव्येंदू भट्टाचार्य यांनी ‘देव डी’, ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘द रेल्वे मॅन’ व ‘रॉकेट बॉयज’ अशा अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये विविधांगी भूमिकेत झळकले आहेत.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121