नेटफ्लिक्सने कसली कंबर, १९ नव्या कलाकृतींची केली घोषणा!

    01-Mar-2024
Total Views | 44
नेटफ्लिक्स या ओटीटी वाहिनीवर जगभरातील विविध भाषांमधील चित्रपट, वेब सीरीज प्रेक्षकांकडून पाहिल्या जातात. आता त्यांच्यासाठी कास नेटफ्लिक्सने आगामी कलाकृतींची यादी जाहिर केली आहे.
 

netflix
netflix 
 
मुंबई : करोना काळानंतर प्रेक्षक ओटीटीकडे अधिक वळला. त्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे ओटीटीवर घरबसल्या प्रेक्षकांना जगभरातील आशय विविध भाषांमध्ये पाहायला मिळतो. सध्या कार्यरत असणाऱ्या अनेक ओटीची वाहिन्यांपैकी नेटफ्लिक्स वाहिनी अधिक प्रेक्षकांना भावते. त्यामुळे प्रेक्षकांसाठी नेटफ्लिक्सने (Netflix) कंबर कसली आहे. खास भारतीय प्रेक्षकांसाठी नेटफ्लिक्सने आगामी चित्रपट आणि वेब सीरिजच्या यादीची घोषणा केली आहे. नेटफ्लिक्सने २९ फेब्रुवारी रोजी तब्बल १९ नव्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. यापैकी काही चित्रपट, वेब सीरिज रिलीजच्या तारखा जाहीर देखील करण्यात आल्या आहेत.
 
 
'नेटफ्लिक्स'च्या नव्या वेब सीरिज
 
नेटफ्लिक्सने जाहिर केलेल्या वेब सीरीजची यादी पुढीलप्रमाणे आहे. यात 'खाकी: द बंगाल चॅप्टर', 'कोटा फॅक्टरी सीझन ३', 'काली काली आंखे सीझन २' आणि 'फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलिवूड वाइव्हज' यांचा समावेश आहे. तसेच, यात डब्बा कार्टेल (Dabba Cartel), मामला लीगल है (Mamla Legal Hai), मिसमॅच (Mismatched), आयसी ८१४ (IC814) आणि मांडला मर्डर्स (Mandala Murders) या वेब मालिकांचा देखील समावेश आहे.
 
 
नेटफ्लिक्सवर कोणते चित्रपट येणार?
 
नेटफ्लिक्सवर लवकरच अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यात 'सिकंदर का मुकद्दर', 'फिर आयी हसीन दिलरुबा', 'दो पत्ती', 'विजय ६९', 'महाराज', ‘वाइल्ड वाइल्ड पंजाब’ हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. टेलिव्हिजनवर कपिल शर्माने विनोदी कार्यक्रम करुन प्रेक्षकांना हसवून वेडं केलं आहे. आता पुन्हा एकदा 'द ग्रेड इंडियन कपिल शो' हा शो नेटफ्लिक्सवर येणार आहे. या शोमध्ये सुनील ग्रोव्हर कॉमेडियन म्हणून कमबॅक करत असून बऱ्याच काळानंतर कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर एकत्र दिसणार आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा
ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

महाराष्ट्र हे वीजनिर्मितीत भारतातील सर्वांत आघाडीचे राज्य. देशात निर्माण होणार्या एकूण विजेच्या १५ टक्के विद्युतनिर्मिती ही एकट्या महाराष्ट्रात होते. परंतु, तरीही मागणीचे प्रमाण हे वीजनिर्मितीपेक्षा जास्त असल्याने आज राज्य सरकार नवीकरणीय ऊर्जानिर्मितीवर भर देत आहे. अशातच नुकतीच राज्य सरकारने मोठी वीजदरकपात जाहीर केली. ज्यामुळे आता पुढील पाच वर्षे वीजबिल वाढणार नाही, तर कमी होणार आहे. तेव्हा राज्यातील वीज ग्राहकांना नेमका हा लाभ कसा मिळणार, यासंबंधी महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधार कंपनीचे स्वतंत्र संचालक ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121