मुंबई: पतांजली आयुर्वेदाच्या कथित दिशाभूल केल्या जाणाऱ्या जाहिराती चर्चेचा विषय बनल्या होत्या.याप्रकरणी न्यायालयाने कडक पवित्रा घेत पतांजलीचे प्रणेते बाबा रामदेव यांना न्यायालयाने पुढच्या सुनावणीत वैयक्तिकरित्या हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने रामदेव बाबांच्या सुनावणीदरम्यान गैरहजरीने न्यायालयाने संतापून हे नवे निर्देश दिले आहेत.
ड्रग्स व रेमिडीज अँक्ट अंतर्गत रामदेव बाबा व कंपनीचे मुख्य आचार्य बालकृष्णन यांना नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यामुळे न्यायालयाने यावर तिखट प्रतिक्रिया देत या संदर्भात सुनावणीदरम्यान कोणतीही नवी दिशाभूल करणारी जाहिरात प्रसारित करण्यास मनाई केली आहे.
हिमा कोहली व अहसानूददीन अमानूला यांच्या खंडपीठाने हा निर्देश या प्रकरणी दिले आहेत.मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये कुठल्याही दिशाभूल करण्याचा जाहीराती थांबवण्याचे न्यायालयाने कंपनीला लिखित स्वरूपात आश्वासन देण्यास सांगितले होते.त्यामध्ये प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमात या जाहिराती प्रसारित करण्याची ताकीद न्यायालयाने मागील २१ नोव्हेंबर २०२३ लाख दिली होती.
इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने १७ ऑगस्ट २०२२ रोजी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. त्यात म्हटल्याप्रमाणे, पतंजलीने कोविड लसीकरण आणि ॲलोपॅथी विरोधात नकारात्मक प्रचार केला.त्याचवेळी, त्याने स्वतःच्या आयुर्वेदिक औषधांनी काही रोग बरे करण्याचा कथित खोटा दावा केला.या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ मार्च रोजी होणार आहे.