सुशांत सिंग राजपूतची बहिण श्वेता हिने व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तपास प्रकरणात मदत मागितली आहे.
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलु कलाकार अशी ओळख असणारा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्या प्रकणाचा अद्याप छडा लागला नाही. १४ जुन २०२० रोजी मुंबईतील राहत्या घरात सुशांत सिंग राजपूतचा (
Sushant Singh Rajput) मृतदेह आढळला होता. त्याच्या मृत्यूनंतर संपुर्ण प्रकरण सीबीआयच्या ताब्यात गेले होते. आता सुशांतची (Sushant Singh Rajput) बहिण श्वेता हिने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे या प्रकरणाचा अंतिम निकाल लवकरात लवकर लागावा अशी विनंती करत त्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी देखील केली आहे.
सोशल मीडियावर सुशांतची बहीण श्वेता हिने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मोठी मागणी करत म्हटले आहे की, “गेल्या ४५ महिन्यानंतरही अद्याप सुशांत सिंगच्या प्रकरणातून आमच्या कुटुंबियांना न्याय मिळाला नाही. या सगळ्यात आम्हाला खूप मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागला आहे. सीबीआयचा तपास आणि न्यायालयीन लढा यातून आम्हाला न्याय मिळावा ही आपल्याला विनंती".
पुढे ती असे देखील म्हणाली आहे की, “मोदीजी मी तुम्हाला आग्रहाची विनंती करते की सुशांत सिंगच्या प्रकरणातून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत. सीबीआयच्या तपासाबाबत तुम्ही मदत केल्यास बरे होईल. तुमच्या मदतीने आम्हाला खूप दिलासा मिळेल. सुशांतच्या निधनाला ४५ महिने उलटूनही त्याबाबत कोणताही तपास आणि त्यातून न्याय आम्हाला मिळालेला नाही. त्यामुळे मी आपल्याला विनंती करते की, या प्रकरणाची दखल घ्यावी”.
सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर त्याची मैत्रिण रिया चक्रवर्ती हिला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तसेच, हिंदी चित्रपटसृष्टीतल एक हुशार नट म्हणून सुशांतची ओळख होती. ‘एम.एस.धोनी’, ‘राबता’, ‘केदारनाथ’, ‘पी.के’, अशा अनेक चित्रपटांत तो झळकला होता.