सुरूवातीच्या संथ सुरूवातीनंतर बाजारात पुनर्जीवन आजचे महत्वाचे शेअर जाणून घेऊया

स्मॉलकॅप व मिडकॅप कंपन्यांच्या समभागात आज विशेष घसरण

    12-Mar-2024
Total Views | 33

stock market
 
मोहित सोमण

मुंबई: इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात बीएससी सेन्सेक्स व निफ्टीत आज संथ सुरूवात झाली परंतु सकाळी ११ च्या सुमारास १९१.५९ अंशाने वाढत सेन्सेक्स ७३६८५.३६ पातळीवर पोहोचला आहे. तसेच निफ्टी २३.९० अंशाने वाढत २२३५६.५५ पातळीवर पोहोचला आहे. काल आंतरराष्ट्रीय पातळीवर गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण होते.परंतु आज निर्देशांकात हिरवा रंग दिसला आहे. निफ्टी बँक दुपारी १२ वाजता घसरला असून बँक निफ्टी ६९.८० अंशाने घसरत ४७२५८.०५ पातळीवर पोहोचला आहे.निफ्टी नेक्स्ट ५० निर्देशांक ८३९.६५ अंशाने घसरत ५९४७१.५० पातळीवर पोहोचला आहे.
 
निफ्टी स्मॉलकॅप मिडकॅप मध्येही अनुक्रमे १.९७ व १.४३ टक्क्याने घसरण झाली आहे. बीएससी मध्ये सेन्सेक्स मध्ये चांगली वाढ झाली असून १२ वाजता सेन्सेक्स ११४ अंशाने वधारत ७३६१६.५४ पातळीवर पोहोचला आहे. व सेन्सेक्स बँक निर्देशांकात मात्र १२४.०७ अंशाने घसरत ५३६६३.२७ पातळीवर पोहोचला आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत बीएससी मिडकॅप निर्देशांक १.४६ टक्क्याने घसरला असून बीएससी स्मॉलकॅप निर्देशांकात २.४ टक्क्याने घसरण झाली आहे.
 
स्मॉलकॅप व मिडकॅप कंपन्यांच्या समभागात आज विशेष घसरण पहायला मिळत आहे.सेबी चेअरमन माधवी पूरी बुच यांनी स्मॉलकॅप व मिडकॅप शेअर मधील किंमतीत अनैसर्गिक फुगवटा असल्याचे घोषित केल्याने यांचा परिणाम बाजारात दिसला आहे.विशेषतः एसएमई (SME) गुंतवणूकदारांच्या भावना या निर्देशांकात दिसून येत आहेत. मात्र तज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय पातळीवर बाजारात चांगले संकेत मिळू शकतात. तरीदेखील गुंतवणूकदारांना सावध राहण्याचा इशारा तज्ञांनी दिला आहे.
 

आज निरिक्षणासाठी महत्वाची शेअर कुठले जाणून घेऊयात
१) K Fin Technologies - के फीन टेक्नॉलॉजीमधील कोटक महिंद्रा बँक आपले भागभांडवल ब्लॉक डिल ( Block Deal) मार्फत काढून घेण्याची शक्यता असल्याचे प्रसारमाध्यमांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे यातील हालचाल पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सकाळच्या सत्रात सुरूवातीला या समभागात (शेअर) मध्ये ६ टक्क्याने घसरण दिसून आली आहे.
 
) HIL Limited - एचआयएल लिमिटेडचे समभाग गुंतवणूकदारांसाठी महत्वाचे ठरत आहेत. कारण बातमीनुसार एचआयएल क्रेस्टिया पोलिटेक ( Crestia Polytech) ही कंपनी २६५ कोटी रुपयांना खरेदी करण्यास असल्याचे म्हटले गेले आहे. त्यामुळे गुंतवणूक या सहभागाला अखेरच्या सत्रात कसा प्रतिसाद देतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
 
३) Dwarikesh Sugar - द्वारीकेष शुगर या कंपनीचे बायबँक समभाग (Buyback) २० मार्चपर्यंत डीलसाठी उपलब्ध असणार आहेत. कंपनीच्या समभाग पात्र धारकांना यात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या बातमीने समभागात कालच्या सत्रात ६ टक्क्याने वाढ झाली आहे.आज त्याला मार्केट प्रतिसाद कसे देईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
 
३) Wipro Company - जगविख्यात आयटी कंपनी विप्रो समभागाकडे आयटी तज्ज्ञांचे लक्ष आहे. कंपनीने हायब्रीड मल्टिक्लाउड व डिजिटल इनोव्हेटिव्ह सोलूशन साठी नवीन बिझनेस युनिट काढले आहेत. त्यामुळे विप्रो समभागात किती फायदा किंवा नुकसान होईल हे अखेरच्या सत्रात दिसेल.
 
४) Mahindra and Mahindra - महिंद्रा व महिंद्रा बँकेच्या इयर ऑन इयर बेसिसवर विक्रीत वाढ झालेली आहे. २६ टक्क्याने विक्री वाढत ७३३७० युनिट्स विकली गेली आहेत. त्यामुळे या शेअर्समध्ये किती हालचाल होते ते पाहणे महत्वाचे ठरेल.
 

५)Aditya Birla Sun Life - आदित्य बिर्ला सन लाईफचे कंपनीचे प्रमोटर ऑफर फॉर सेल ( OFS) साठी ५ टक्के भागभांडवलाची विक्री करू शकतात. तसेच आदित्य बिर्ला कॅपिटल व आदित्य बिर्ला फायनान्स यांच्या एकत्रिकरण ( Merger) होणार असल्याच्या बातमीच्या आधारे आदित्य बिर्लाचे समभाग पाहणे महत्वाचे ठरेल.
 
६) SBI Bank - एसबीआय बँकेला न्यायालयाने इलेक्ट्रोल बाँडची माहिती सार्वजनिक करण्यासाठी मुदत वाढवायला नकार दिल्याने आज बँकेला देणगी व देणगीदारांची माहिती जाहीर करावी लागेल. सकाळच्या सत्रात शेअर बाजारात १.३० टक्क्याने एसबीआय (SBI) समभाग घसरले आहेत. विशेषतः पीएसयु बँकेत घसरण झाली असताना खाजगी क्षेत्रातील बँकांच्या निर्देशांकात वाढ झाली आहे. एचडीएफसी , इंडसइंड बँकेच्या समभागात १ ते २ टक्क्याने वाढ झाली असताना बँक ऑफ इंडियाचा समभाग २.८८ टक्क्याने घसरला आहे.
 
७) RVNL - रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) या कंपनीला नवीन सिग्नलिंग व टेलिकम्युनिकेशन स्वस्त निविदेमुळे नवीन ऑडर मिळाली आहे. त्यामुळे या समभागात हालचाल पाहणे गुंतवणूकदारांसाठी स्वाभाविक ठरणार आहे.
 
८)ITC - ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार ब्रिटिश अमेरिकन टोबॅको आयटीसीमधील आपले २०० ते ३०० कोटी डॉलर्सचे भागभांडवल ब्लॉक डिल मार्फत विकू शकते.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121