जयपूर : राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात पोलिसांनी शोध मोहिम राबवून बीफ मार्केट चालवणाऱ्या सर्व २२ आरोपींना अटक केली आहे. त्यापैकी ९ आरोपींना दि.२६ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. साहुन, हारुण, इब्राहिम, सलीम खान, मनान, खालिद खान, हब्बी, सलीम आणि कय्युम अशी त्यांची नावे आहेत. यापैकी कय्युम हा जुना हिस्ट्री शीटर असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची पोलीस कोठडी घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे. ८ दिवस चाललेल्या या कारवाईत सुमारे २०० पोलिसांचा सहभाग असून त्यांनी रात्रंदिवस छापे टाकून आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी कयूम हा दोन वर्षांपासून फरार होता. त्याच्यावर २००० रुपयांचे बक्षीसही प्रशासनाने जाहीर केले होते.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कय्युम विरोधात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात आधीच ५ गुन्हे दाखल आहेत. किशनगढबास आणि कोटपुतली पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या या एफआयआरमध्ये गोहत्या, अबकारी कायदा आणि खून यासारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. त्याच्याविरुद्ध ११ वर्षांपूर्वी २०१३ मध्ये पहिला गुन्हा दाखल झाला होता. अटक करण्यात आलेला आणखी एक आरोपी मनन हा जुना हिस्ट्रीशीटर असल्याची माहिती आहे. त्याच्यावर तातारपूरमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
याशिवाय इब्राहिमविरुद्ध अलवर सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे, तर साहुन आणि खालिदविरुद्ध किशनगढबास पोलिस ठाण्यात आधीच गुन्हा दाखल आहे. दरम्यान इतर आरोपींवरील गुन्हेही तपासले जात आहेत. हे सर्व आरोपी अनेक वर्षांपासून या भागात बीफ मंडी चालवत होते.दि.२६ फेब्रुवारी १३ आरोपींना गजाआड करण्यात आले. या सर्वांना पोलीस कोठडीत घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे. आता दि.२६ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आलेल्या या आरोपींच्या रिमांडचीही न्यायालयाकडून मागणी केली जाऊ शकते. त्यांच्या चौकशीदरम्यान बीफ मार्केट रॅकेटशी संबंधित इतर अनेकांची नावेही समोर येऊ शकतात.