इंडी आघाडीला धक्का!; राहुल गांधींच्या मतदारसंघातून 'सीपीआय'चा उमेदवार

    26-Feb-2024
Total Views | 42
CPI Candidates Wayanad Constituency

नवी दिल्ली : 
इंडिया आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यूला निश्चित झाला नसताना आता पुन्हा एकदा आघाडीतील विसंवाद समोर आला आहे. दरम्यान, खासदार राहुल गांधी यांच्या वायनाड मतदारसंघातून डाव्यांकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वायनाड मतदारसंघातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने उमेदवार म्हणून डी राजा यांच्या पत्नी अॅनी राजा यांना उमेदवारी जाहीर केली आहे.


दरम्यान, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (सीपीआय) केरळमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. त्यानुसार, गांधींच्या वायनाड मतदारसंघातून सीपीआय पक्षाकडून अॅनी राजा लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. या निर्णयामुळे इंडी आघाडीत विसंवाद पुन्हा एकदा समोर आला आहे. सध्या काँग्रेसचे राहुल गांधी वायनाड लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121