लखनऊ : उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकरणात पोलिसांनी मौलवी आणि मौलानाविरुद्ध एफआयआर नोंदवली आहे. अमेठीतील एका मशिदीचा मौलाना मोठ्या आवाजात अश्लील गाणी वाजवून तरुणीसोबत अश्लील कृत्य करताना पकडला गेला. दुसऱ्या घटनेत छत्तीसगडमधील बिलासपूर येथील एका दर्ग्याच्या मौलवीविरुद्ध अंधश्रद्धा पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिथे क्रॉस असलेल्या मुलींची छायाचित्रेही जप्त करण्यात आली आहेत.एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पहिले प्रकरण अमेठीच्या जैस पोलीस स्टेशन भागातील आहे. मोझमगंज गावातील मशिदीत एक मौलाना सुमारे ७ वर्षे राहत होता. तो अनेकदा मुखवटा घालत असे. त्याचे हे कृत्य पाहून गावातील लोक त्याच्यावर लक्ष ठेवून होते. दि.२१ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री एक महिला त्याच्या झोपडीकडे जाताना दिसली, तेव्हा तिच्यावर लक्ष ठेवून असलेल्या गावकऱ्यांनी तिचा पाठलाग केला.
लोक झोपडीत पोहोचले तेव्हा त्यांना मौलाना आणि महिला आक्षेपार्ह अवस्थेत सापडलेले दिसले. मौलानाने हे प्रकरण शांत करण्याची विनंती केली, पण गावकऱ्यांनी ते मान्य केले नाही. गावकऱ्यांचा आरोप आहे की मौलाना गावातील एका मुलीसोबत मशिदीच्या शेडमध्ये मौजमज्जा करताना आढळला होता.यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच गस्तीवर असलेले पोलिस पथक मशिदीजवळ पोहोचले आणि मौलानाला अटक केली. यावेळी अंदाजे १८ वर्षीय तरुणीच्या कुटुंबीयांनाही बोलावून त्यांची मुलगी त्यांच्या स्वाधीन करण्यात आली. मौलाना आपल्या ऐषोआरामावर लाखो रुपये खर्च करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
एवढेच नाही तर मौलाना टॉनिकची औषधे घेत असे आणि ते ब्रँडेड पाणी मागवून तो प्यायचा. तो वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा पार्ट्या आयोजित करत असे, त्यात लाखो रुपये खर्च होत असत. गावकऱ्यांनाही आरोपी मौलानाचे नाव आणि नेमका पत्ता माहीत नाही.दरम्यान छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये आणखी एका प्रकरणात पोलिसांनी भूत-भानामतीच्या नावाखाली समाजात अंधश्रद्धा पसरवणाऱ्या एका मौलवीविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. सादिक खान असे आरोपीचे नाव आहे. सादिक खान यांच्यावर तोरवा पोलीस स्टेशन हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधलेल्या घराचे धार्मिक प्रार्थनास्थळात रूपांतर केल्याचा आरोप आहे.
या जागेला त्यांनी चिल्ला मुबारकपूर दर्गा म्हणायला सुरुवात केली. भूतबाधाच्या नावाखाली लोकांचे मोठे आजार बरे करण्याचा दावाही त्यांनी केला. छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी दि.२२ फेब्रुवारीव २०२४ रोजी या प्रकरणी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. बिलासपूर पोलिसांनी सांगितले की, आरोपी मौलवी सादिक खान याच्याविरुद्ध जादूटोणा कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. भूतबाधा झाल्याचे सांगून तो लोकांची दिशाभूल करायचा.महापालिकेकडून नोटीस मिळाल्यानंतर घरामध्ये बांधलेला घुमट हटवण्यात आला आहे. या ठिकाणी अशी सुमारे ६५ कुटुंबे सापडली आहेत, जी प्रधानमंत्री योजना गृहनिर्माण अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांमध्ये बेकायदेशीरपणे राहत होती. याप्रकरणी स्थानिक प्रशासन चौकशी करून कारवाई करत आहे.