तिरुअंनतपुरम : केरळमध्ये लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह नदीतून सापडला आहे. सिद्दीकी अली नावाच्या कराटे शिक्षकावर एका विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. सिद्दिकीला पोलिसांनी अटक केली आहे. सिद्दीकी विद्यार्थिनींना चुकीच्या गोष्टी सांगून त्यांचे लैंगिक शोषण करत असे. त्याच्यावर याआधी ही दोन पॉक्सो गुन्हे दाखल आहेत.एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मलप्पुरममधील वझक्कड पोलीस स्टेशन परिसरात दि.१९ फेब्रुवारी २०२४ रोजी चेल्लियार नदीत एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला होता. ही विद्यार्थीनी गेल्या तीन वर्षांपासून एका कराटे शिक्षकाकडे कराटे शिकण्यासाठी जात होती. व्ही सिद्दीकी अली असे या शिक्षकाचे नाव असून तो ४३ वर्षांचे आहे. अल्पवयीन मुलाचा मृतदेह सापडला तेव्हा तिच्या अंगावरील काही कपडेही गायब होते.
मुलीने आत्महत्या केली नसून तिचा खून झाल्याचा आरोप अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. वृत्तानुसार, घटनेच्या दिवशी ज्या ठिकाणी मृतदेह सापडला त्या ठिकाणी काही लोकांनी दोन अनोळखी व्यक्तींना पाहिले होते. पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शेजाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, दोघेही तोंड न दाखवता तेथून निघून गेले.या आधारे संशय असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. ज्या अवस्थेत मृतदेह सापडला त्यावरून त्याने आत्महत्या केल्याचे दिसत नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. ते सांगतात की, विद्यार्थीनी अभ्यासात खूप हुशार होती आणि कराटेही शिकत होती.तिच्यावर बरेच दिवस लैंगिक अत्याचार होत होते.
पीडित मुलीच्या बहिणींनी सांगितले की सिद्दीकी अलीने इतर मुलीचे ही शोषण केले होते आणि त्याच्यावर यापूर्वी दोन पॉक्सो गुन्हे दाखल आहेत. तिने सांगितले की, सिद्दीकी अलीने १५ सप्टेंबर २०२३ रोजी तिच्या बहिणीवर लैंगिक अत्याचार केले होते. यानंतर तो तीन वर्षांपासून हे काम करत असल्याचे उघड झाले. दहावीत चांगले गुण मिळाले असतानाही या मुलीने शाळेत जाणेही बंद केले होते.त्यानंतर त्यांनी याप्रकरणी तक्रारही दाखल केली. सिद्दीकी अली हा इतर मुलींसोबतही हे कृत्य करायचा. कराटे शिकविण्याच्या नावाखाली तो मुलींच्या शरीराला अयोग्यरित्या स्पर्श करत असे. तसेच पीडित मुलींच्या छातीला स्पर्श करून सांगत की, माझ्या समाधानासाठी तुमचे शरीर समर्पित करा. तरच तुम्ही यशस्वी व्हाल. तरी या प्रकरणी सिद्दीकीविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.