मुंबई: मंगळवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपले बुलेटिन प्रसिद्ध केले आहे. त्यात लिहिल्याप्रमाणे, आर्थिक वर्ष २३-२४ च्या अर्ध्या वर्षात मोठी आर्थिक प्राप्ती शक्य झाली आहे. आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये अर्थव्यवस्थेने चांगली वाटचाल दर्शविली आता खाजगी क्षेत्रातील कंपन्यांनाकडून भांडवली खर्चामुळे ( कॅपिटल एक्स्पेंडिचर) मुळे आर्थिक घोडदौड अधिक वाढेल असा विश्वास आरबीआयने व्यक्त केला आहे.
बुलेटिनमधील 'स्टेट ऑफ इकॉनॉमी 'या लेखातील म्हटल्याप्रमाणे ' आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये अपेक्षित वाढीहून अधिक वाढीमुळे अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत पोहोचली आहे.' असे आरबीआयने म्हटले आहे. वाढलेले आर्थिक निर्देशांक पाहता २३-२४ मधील विकास वाढ पुढेही राहण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेने आगामी काळात आर्थिक वर्ष २४-२५ मध्ये ७ टक्क्यांचा विकासदर राहील याचे भाकीत केले आहे.
महागाईवर बोलतांना आरबीआयने लिहिले आहे की, ' ग्राहक महागाई किंमत ही नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात वाढली असली तरी मात्र २०१९ पासून वाढलेल्या महागाईचा हा नीचांक होता. याखेरीज बुलेटिनमध्ये म्हटल्याप्रमाणे आर्थिक वर्ष २४-२५ मध्ये कनज्यूमर प्राईज इंडेक्समध्ये घाऊक महागाई दर ४.५ टक्के राहील.
याशिवाय लेखातील लेखकाने लिहिलेली अनुमाने ही आरबीआयचीच अधिकृत मते नसल्याचा दावा लेखकानी केला आहे.