दिल्ली दंगलीतील आरोपी नूरा आणि नबी मोहम्मदला न्यायालयाने सुनावली सजा!
02-Feb-2024
Total Views | 74
नवी दिल्ली : न्यायालयाने दि. ३१ जानेवारी २०२४ बुधवारी २०२० साली दिल्लीत झालेल्या दंगलीत दोन दोषींना शिक्षा ठोठावली आहे. नूर मोहम्मद उर्फ नूरा आणि नबी मोहम्मद असे या आरोपींची नावे आहे. या खटल्यात सुनावणी करताना न्यायालयाने म्हटले की, "जे गुन्हे घडले ते द्वेष आणि लालसेने प्रेरित होते." या खटल्यात नबी मोहम्मदने आधीच सुनावलेली शिक्षा पुरेशी मानून न्यायालयाने नूराला चार वर्षांच्या शिक्षा सुनावली.
नूराला शिक्षा सुनावताना, करकरडूमा न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश पुलस्त्य प्रमाचाला म्हणाले, "दंगलीचे कृत्य द्वेषाने प्रेरित होते, तर लुटमार आणि रोकड लुटणे हे लालसेने प्रेरित होते." नूरा आणि नबी मोहम्मद यांना गेल्या महिन्यात खजुरी खास पोलीस ठाण्यात २०२० मध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये दोषी ठरवण्यात आले होते. नबी मोहम्मदलाही दरोड्याच्या गुन्ह्यात शिक्षा झाली होती.
न्यायालयाने आरोपी नूर मोहम्मद उर्फ नूरा याला आयपीसी कलम १४८/४२७/४३५/४३६ अंतर्गत शिक्षापात्र गुन्ह्यांसाठी दोषी ठरवले आहे. दोषी नूर मोहम्मद उर्फ नूराला देखील आयपीसीच्या कलम ३९२ आणि १८८ अंतर्गत दंडनीय गुन्ह्यांसाठी दोषी ठरवण्यात आले आहे. तर, दोषी नबी मोहम्मद याला आयपीसी कलम ४११ अन्वये शिक्षापात्र गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले आहे.
न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की, “नूर मोहम्मदने दंगल केली आणि दिलीपच्या ऑटो मोबाईल शॉपची तोडफोड केली आणि नंतर आग लावली. दिलीप व शिवकुमार यांचे मोबाईल लंपास करण्यात आले. याशिवाय उपरोक्त दुकानात पडलेल्या मालाचेही नुकसान झाले. अशोक फोम आणि फर्निचर नावाच्या दुकानाची तोडफोड आणि जाळपोळ करताना रामदत्त पांडे, मनोज नेगी, सोनू शर्मा, पप्पू आणि अशोक कुमार यांच्या मोटारसायकली पेटवून दिल्या.
आरोपी नूरासह हा जमाव दिल्ली पोलिसांनी पारित केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे (कलम १४४) उल्लंघन करून जमला होता.” नूर मोहम्मदला ४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावताना न्यायालयाने म्हटले की, त्याची पार्श्वभूमी धार्मिक कट्टरतेने प्रवृत्त असल्याचे दर्शवते." या आधारे न्यायालयाने नूरा मोहम्मदला ४ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.