मुंबई : 'महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ', नागपूर अंतर्गत विविध पदांकरिता अर्ज मागविण्यास सुरूवात झाली आहे. महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठातील भरतीसंदर्भात जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत काम करु इच्छिणाऱ्यांसाठी चागंली संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर मधील रिक्त पदांबाबत सविस्तर तपशील जाणून घेऊयात.
पदाचे नाव -
सहाय्यक प्राध्यापक (६४ जागा)
शैक्षणिक पात्रता -
उमेदवाराकडे मास्टर्स ही पदवी असणे आवश्यक आहे.
सविस्तर तपशीलांसाठी जाहिरात पाहावी.
वयोमर्यादा -
कमाल ३८ वर्षे
अर्ज शुल्क -
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५०० रुपये
मागसवर्गातील उमेदवारांसाठी ७५० रुपये
अर्ज सादर करण्यासाठी ऑफलाईन पध्दतीने करावयाचा आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : निबंधक, महाराष्ट्र प्राणी आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, फुटाळा तलाव रोड, नागपूर- ४४०००१
अंतिम मुदत दि. १५ मार्च २०२४ असेल.
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.